ETV Bharat / state

'परवानगी मिळो अगर न मिळो मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणारच'

author img

By

Published : Jul 3, 2021, 7:21 AM IST

Updated : Jul 3, 2021, 8:06 AM IST

जुना पुणे नाका येथील संभाजी चौक जवळील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा काढला जाणार आहे. यानंतर संभाजी महाराज पुतळ्यापासून पायी चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. राज्यातील सर्वात मोठा मोर्चा सोलापुरात काढला जाणार असल्याची माहितीही नरेंद्र पाटील यांनी सांगितली.

narendtra patil
नरेंद्र पाटील

सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शहरात रविवारी 4 जुलैला मराठा क्रांती आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. फौजदार चावडी पोलिसांनी सदर मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीदेखील मोर्चा काढणार असल्याची भूमिका अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मांडली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी हेरिटेज मंगल कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

माध्यमांशी बोलताना नरेंद्र पाटील

जुना पुणे नाका येथील संभाजी चौक जवळील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा काढला जाणार आहे. यानंतर संभाजी महाराज पुतळ्यापासून पायी चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. राज्यातील सर्वात मोठा मोर्चा सोलापुरात काढला जाणार असल्याची माहितीही नरेंद्र पाटील यांनी सांगितली. सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संपूर्ण मराठा समाजात एक संतापाची लाट पसली आहे. लवकरात लवकर मराठा माजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

परवानगी नाकारली -

रविवारी 4 जुलै रोजी 11 वाजता संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा क्रांती आक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे. हा परिसर फौजदार चावडी पोलीस ठाण्यांतर्गत येतो. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी या मोर्चास परवानगी नसल्याचा आदेश पारित केला आहे. सोलापुरात कोरोना महामारीचा वाढता संसर्ग पाहता व तसेच डेल्टा प्लस आणि म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढतील यामुळे मराठा क्रांती आक्रोश मोर्चास परवानगी नाकारली जात आहे, असे आदेश पारित केले आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणाचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात, आघाडी सरकारच्या नेत्यांना दिलासा?

परवानगी मिळो अगर न मिळो...

नरेंद्र पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, पोलिसांची परवानगी मिळो अगर न मिळो मोर्चा काढला जाणार आहे. राज्यातील सर्वात मोठा असा सोलापुरात 4 जुलै रोजी मोर्चा निघेल, असे ते म्हणाले. केवळ शेतकरी वर्ग या मोर्चात सहभागी होणार नाहीत तर मराठा समाजातील सर्व नागरिक या मोर्चात सहभागी होतील, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.

मोर्चात सहभागी होण्यासाठी 'या' नेत्यांना दिले आमंत्रण -

दरम्यान, 4 जुलैला होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजातील अनेक राजकीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे छत्रपती, आमदार शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना समावेश आहे. काही लोक या मोर्चाला राजकीय रंग देऊ पाहत आहेत. मात्र, हा मोर्चा सर्वपक्षीय असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.

शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा उल्लेख 'द ग्रेट मराठा' असा केला जातो. हे पाहता मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी खुद्द याबाबत खुलासा करावा आणि आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत जाहीर सर्वपक्षीय चर्चा आयोजित करा, चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Last Updated : Jul 3, 2021, 8:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.