पंढरपूर - राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यात 4500 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शुक्रवारी दिवसभरात 614 नवीन कोरोना बधितांची भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून कडक प्रतिबंध करण्यात आले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत खासगी अस्थापना चालू ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर शनिवारी व रविवारी सोलापूर जिल्हा संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात तुरळक गर्दी होती.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आस्थापना परिस्थिती लागू केली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. त्यामध्ये मंदिर प्रशासनाला सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र शनिवारी व रविवारी मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. मंदिर प्रशासनाकडून कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून भाविकांना मुखदर्शन दिले जात आहे. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता पंढरपुरातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट हे शनिवारी व रविवारी बंद होते. यामुळे भाविकांची अडचण निर्माण झाली होती.
पंढरपूर, बार्शी, माळशिरस तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव-
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी, माळशिरस या तालुक्यातील कोरोनाची संख्या मोठी आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सुमारे साडे तीनशेच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. बार्शी व पंढरपूर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आस्थापना सेवा संपूर्ण सेवा शनिवार व रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
पंढरपुरात कोरोनाबाबत जनजागृती-
श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात रोज मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यामुळेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासन व पंढरपूर नगरपरिषदकडून कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांकडून शहरातील स्टेशन रोड, विठ्ठल मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक जनजागृती करण्यात आली. पंढरपूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले.
हेही वाचा- संजय राऊत शिवसेनेचे नाहीत तर शरद पवारांचे प्रवक्ते, नाना पटोलेंची टीका