ETV Bharat / state

शेकडो झाडे वाचविण्यासाठी संघर्ष सुरू; पाण्याअभावी झाडे धोक्यात

या कामासाठी पर्यारणप्रेमी दानशुरांनी मदत करावी, अशी आपेक्षा या कुटुंबाकडून व्यक्त केली जात आहे.

झाडे जगवण्यासाठी धडपड सुरू
author img

By

Published : Apr 7, 2019, 4:51 PM IST

सोलापूर - करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ परिसरात मागील ४ वर्षांपासून मोठ्या कष्टाने जोपासलेली झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत. या झाडांना जगवण्याची धडपड सुरवसे आणि मोकाशी यांच्या कुटुंबाने सुरू केली आहे. या कामासाठी पर्यारणप्रेमी दानशुरांनी मदत करावी, अशी आपेक्षा या कुटुंबाकडून व्यक्त केली जात आहे.

करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ येथील श्री खंडोबा मंदिर परिसरातील शेकडो झाडांचे भविष्य पाण्याअभावी धोक्यात आले आहे. येथील देवराईस पाण्याची गरज निर्माण झाली असून पर्यावरण प्रेमी दानशुरांनी पाणी पुरवठ्यासाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे. देवीचा माळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी माता मंदिरानजीक असलेल्या श्री खंडोबा मंदिर परिसरात पर्यावरण प्रेमी युवक तेजस सुरवसे तसेच पुजारी मोकाशी परिवार यांच्या अथक योगदानातून शेकडो झाडे वाढीला लागलेली आहेत. परिसरात ३ ते ४ वर्षांपूर्वी लागवड झालेल्या या झाडांमुळे नैसर्गिक सुंदरता वाढीस लागली आहे. मात्र, सध्याच्या दुष्काळ स्थितीत पाण्याअभावी ही झाडे संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.

झाडे जगवण्यासाठी सुरू असलेली धडपड सांगताना महिला

या परिसरातील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या झाडांना पाणी मिळणे अवघड झाले असल्याची माहिती तेजस सुरवसे यांनी दिली आहे. सध्या मिळेल त्या पद्धतीने सुरवसे आणि श्रीमती मोकाशी हे झाडे जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना पर्यावरणप्रेमी दानशुरांकडून मदतीची आवश्यकता निर्माण झाली असून झाडे जगण्यासाठी पाण्याचा टँकर मिळावा. अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या झाडांसाठी जर योग्य वेळी पाणी मिळाले तर जळत चाललेल्या झाडांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे.

Intro:R_MH_SOL_03_06_WATER_NEED_FOR_TREE_S_PAWAR
शेकडो झाडे वाचविण्यासाठी सुरू झालाय संघर्ष
पाण्या अभावी जळणाऱ्या झाडांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
सोलापूर-
मोठ्या कष्टाने मागील चार वर्षापासून जोपासलेली झाडे पाण्या अभावी जळून जात आहेत. अथक परिश्रमातून जोपासलेली झाडे डोळ्या समोर जळून जातांना पहावत नाही त्यामुळे आपल्या कूवती प्रमाणे पाण्या वाचून जळत चाललेल्या झाडांना जिवंत ठेवण्यासाठीचा प्रयत्न करमाळ्यातील कमलाई देवीच्या माळावरील सुरवसे आणि मोकाशी यांच्या कुटूंबाने सुरू केला आहे. या दोन कुटूंबानी सुरू केलेल्या या प्रयत्नांना आणखी काही दानशूरांची मदत मिळाली तर कमलाई देवीच्या माळावरील देवराई ही जीवंत ठेवण्यात मदत होणार आहे. Body:करमाळा तालुक्यातील श्रीदेवीचामाळ येथील श्री खंडोबा मंदिर परिसरातील शेकडो झाडांचे भविष्य पाण्याअभावी धोक्यात आले आहे.येथील देवराईस पाण्याची गरज निर्माण झाली असून पर्यावरण प्रेमी दानशुरांनी पाणी पुरवठ्यासाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे. देवीचा माळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी माता मंदिरानजीक असलेल्या श्री खंडोबा मंदिर परिसरात पर्यावरण प्रेमी युवक तेजस सुरवसे तसेच पुजारी मोकाशी परिवार यांच्या अथक योगदानातून शेकडो झाडे वाढीला लागलेली आहेत.तीन ते चार वर्षांपुर्वी लागवड झालेल्या या झाडांमुळे नैसर्गिक सुंदरता वाढीस लागली आहे.मात्र सध्याच्या दुष्काळ स्थितीत पाण्याअभावी ही झाडे संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणचे जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या झाडांना पाणी मिळणे अवघड झाले असल्याची माहिती तेजस सुरवसे यांनी दिली आहे. सध्या मिळेल त्या पद्धतीने सुरवसे आणि श्रीमती मोकाशी हे झाडे जगविण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना पर्यावरणप्रेमी दानशुरांकडून मदतीची आवश्यकता निर्माण झाली असून झाडे जगण्यासाठी पाण्याचा टँकर मिळावा.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या झाडांसाठी जर योग्य वेळी पाणी मिळाले तर जळत चाललेल्या झाडांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे.

बाईट - 1 - तेजस सुरवसे
बाईट - 2 - महिलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.