ETV Bharat / state

Vitthal-Rukmini Darshan : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू - Vitthal-Rukmini Darshan On

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पांडुरंगाचे दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या पायाशी माथा टेकून दर्शन घेता यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती. (Vitthal-Rukmini Darshan) त्या प्रस्तानावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिली आहे अशी माहिती समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी
विठ्ठल-रुक्मिणी
author img

By

Published : Mar 30, 2022, 7:23 AM IST

सोलापूर (पंढरपूर) - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पांडुरंगाचे दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या पायाशी माथा टेकून दर्शन घेता यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती. (Warakaris take Vitthal-Rukmini darshan ) त्या प्रस्तानावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिली आहे अशी माहिती समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्शाने सुरू करण्याची मागणी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी व भाविक भक्तांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थिती विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंद आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शनाची सोय विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आली आहे. त्यासंबंत विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदस्यांकडून विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन सुरू व्हावी अशी मागणी करण्यात आली. त्या संदर्भात राज्य शासनाकडे मागणी करण्यात आला होती.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून विठुरायाचे दर्शन घेता न आलेल्या भाविकांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठूरायाच्या पायावर माथा टेकून दर्शन करता येणार आहे. या मागणीसाठी वारकरी शिक्षण संस्थेमधील बाल वारकर्‍यांसह विविध वारकरी प्रतिनीधी यांच्या वतीने संत नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले होते.

हेही वाचा - ऐकावे ते नवलच! ढोल-ताशांच्या गजरात रेल्वेच्या शेवटच्या अॅम्बेसिडर कारला निरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.