सोलापूर - ओबीसी, आदिवासी, दलित, मुस्लीम यांना पुरावे देण्याची सक्ती केंद्र सरकार करत असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.
यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी विरोध दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. यामार्फत ओबीसी, आदिवासी, दलित व मुस्लीम समाजामध्ये जागृती करून कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे करमाळ्यात दिनांक 8 जानेवारीला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा : मोर्चा बघून दडत्यात... कामगार प्रश्नी अंगणवाडी सेविकेचा क्रांती गीतातून सरकारवर आसूड
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुभाष ओहोळ, नगरसेवक अल्ताफ तांबोळी व उपनगराध्य अहमद कुरेशी उपस्थित होते. तसेच शहर अध्यक्ष विशाल लोंढे, ज्ञानदेव काकडे आदी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.