ETV Bharat / state

विठ्ठल रुख्मिणीच्या गाभाऱ्यास ३१०० हापूस आंब्याची आरास; विठ्ठल मंदिराला आले आमराईचे रूप - sankasht chaturthi solapur

लॉकडाऊनमुळे तब्बल ३ हजार नागरिक हे पंढरपुरात अडकले आहेत. हे नागरिक लोक मंदिर समितीच्या अन्नछत्र मंडळात अडकून पडलेले आहेत. या सर्वांची व्यवस्था मंदिर समितीकडून करण्यात आलेली आहे. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात जी हापूस अब्यांची आरास करण्यात आली आहे, त्या आंब्याचा रस अडकलेल्या ३ हजार लोकांना देण्यात येणार आहे.

vitthal rukmini temple solapur
श्री. विठ्ठल रुक्मिणी
author img

By

Published : May 10, 2020, 12:46 PM IST

सोलापूर- आज श्री. संकष्ट चतुर्थी निमित्त श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास ३१०० रत्नागिरी हापूस आंब्यांनी व आंब्याच्या पानांनी आकर्षक अशी आरास करण्यात आली. हापूस आंब्याची आरास केल्यामुळे गाभाऱ्यास मनमोहक असे आमराईचे रूप प्राप्त झाले.

श्री. विठ्ठल रुक्मिणीचे दृश्य

रत्नागिरी हापूस आंब्याच्या आमराईत पंढरीची विठ्ठल रखुमाई नटून दिसत होती. रत्नागिरी येथून खास मागविण्यात आलेल्या ३१०० हापूस आंब्यांनी विठ्ठलाचा गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आरास करण्यात आले. त्यामुळे, श्री. विठ्ठल रखुमाई आमराईत उभे असल्याचा भास होत असून देवाचे हे लोभस रूप आज अधिकच खुलून दिसत आहे.

कोरोनाचे विश्वावर ओढावलेले संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्र सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक हरीश बैजल, पुण्यातील उद्योगपती अजय सालुखे, व इतर भक्तांनी आंब्याची पूजा अर्पण केली आहे. लॉकडाऊनमुळे तब्बल ३ हजार नागरिक हे पंढरपुरात अडकले आहेत. हे नागरिक लोक मंदिर समितीच्या अन्नछत्र मंडळात अडकून पडलेले आहेत. या सर्वांची व्यवस्था मंदिर समितीकडून करण्यात आलेली आहे. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात जी हापूस अब्यांची आरास करण्यात आली, त्या आंब्याचा रस अडकलेल्या ३ हजार लोकांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा- जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी आणि जिल्ह्यात येण्यासाठी तब्बल 16 हजार 74 अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.