सोलापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशभरातील मंदिरे दर्शनासाठी बंद झाली. त्याच प्रमाणे राज्याचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठलाचेही मंदिरही वारकऱ्यांसाठी बंद राहिले. मात्र, चैत्रीपाठोपाठ आषाढी वारीच्या काळातही पंढरपूरचं मंदिर दर्शनासाठी बंद असतानाही गरिबांचा देव विठोबा लखपती झाला आहे. आषाढी वारी काळात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या दान पेटीत चक्क 16 लाख 15 हजार 860 रुपयांची देणगी जमा झाली आहे.
अशी आली देणगी....
पांडुरंगाच्या दानपेटी जमा झालेल्या देणगीमध्ये ऑनलाईनद्वारे अन्नछत्रासाठी 66 हजार, महानैवेद्य 30 हजार, आणि देणगी रुपाने 3 लाख 42 हजार 712 रुपये. तर इतर माध्यमातून 11 हजार 77 हजार 148 रुपयांची रकमेचा समावेश आहे. गेल्यावर्षी आषाढीवारीला 4 कोटी 41 लाख देणगी मिळाली होती. त्या तुलनेत यंदाची रक्कम कमी असेल पण मंदिर बंद असतानाही हे दान मिळाल्यामुळं मंदिर समिती प्रशासनानं समाधान व्यक्त केले आहे.