ETV Bharat / state

संचारबंदी उल्लंघन प्रकरणी गोपीचंद पडळकरांसह 25 जणांवर गुन्हा दाखल - संचारबंदी उल्लंघन प्रकरणी गोपीचंद पडळकरांवर गुन्हा

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठका घेतल्या आणि गर्दी जमा केली व कोरोना नियमावलीचे भंग केले. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आमदार गोपीचंद पडळकरांसह 25 जणांवर आपत्ती व्यवस्थापन आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Jul 2, 2021, 8:42 PM IST

Updated : Jul 2, 2021, 8:56 PM IST

सोलापूर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरातील विविध ठिकाणी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी बुधवारी (30 जून) रोजी घोंगडी बैठका घेतल्या होत्या. या बैठका दिवसभर सोलापुरातील विविध ठिकाणी संपन्न झाल्या. भवानी पेठ येथील मडी वस्ती येथे सायंकाळी उशिरापर्यंत घोंगडी बैठक झाली. पण सोलापुरात सध्या 5 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठका घेतल्या आणि गर्दी जमा केली व कोरोना नियमावलीचे भंग केले. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आमदार गोपीचंद पडळकरांसह 25 जणांवर आपत्ती व्यवस्थापन आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर
विना परवानगी सोलापुरात घोंगडी बैठक

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. ते आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी विविध ओबीसी नेते व राजकीय नेते ओबीसी समाजाला सोबत घेऊन बैठका घेत आहेत. बुधवारी 30 जून रोजी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा सोलापूर दौरा झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विविध ठिकाणी घोंगडी बैठका घेण्यात आल्या होत्या. पण या बैठका घेण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती. कोरोना महामारीमुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाचे अनेक बंधन लावले आहेत. कोणत्याही सभेला किंवा राजकीय बैठकांना पोलीस परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. पण आमदार पडळकर यांच्या घोंगडी बैठकांची पोलीस परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापनाचे उल्लंघन

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भवानी पेठ येथे सायंकाळी घोंगडी बैठक घेतली. सोलापुरात स्थानिक प्रशासनाने सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू केली आहे. तरीही बैठक झाल्याने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई असिफ शेख यांनी तक्रार दिली असून आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत आमदार गोपीचंद पडळकर, संजय कणके, प्रकाश कारंडे, संजय पूजारी, राजू बंडगर, संतोष कारंडे, प्रकाश आंनदकर, रवी हक्के, सचिन पाटील, समर्थ माशाळकर, अजय रुपनर, शरनु हांडे, बिपीन पाटील, परदेशी व इतर 10 ते 15 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -'तो' दगड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारला हे कशावरून? - अजित पवार

Last Updated : Jul 2, 2021, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.