ETV Bharat / state

गुटख्याची चोरटी वाहतूक पोलिसांनी पकडली; 21 लाखांचा गुटखा जप्त

सोलापूरमधून कर्नाटकला गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी पोलिसांनी नाकाबंदी लावत ट्रकमधील 21 लाख 60 हजारांचा गुटखा पकडला. गुटखा, ट्रक असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोघांना अटक केली आहे.

Vijapur naka police
विजापूर नाका पोलीस
author img

By

Published : Aug 17, 2020, 5:08 AM IST

सोलापूर-गुटख्याची चोरटी वाहतूक रोखण्यात विजापूर नाका पोलिसांना यश आले आहे. गुटखा वाहतूक करणाऱ्यांनी बेसनच्या पोत्याखाली 21 लाख 60 हजार रुपयांच्या गुटख्याच्या बॅगा लपवल्या होत्या.पोलिसांनी वाहनाची तपासणी करत मोठा गुटखा साठा जप्त केला आहे. सर्व मुद्देमाल हस्तगत करत कल्याणी शंकर तेजमाने (वय 60 वर्ष,रा. पुजारी गल्ली, गुलबर्गा,कर्नाटक) आणि संजीवकुमार सिद्धलिंग कोळी( रा,सन्मित्र नगर शेळगी जवळ, सोलापूर, महाराष्ट्र) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल लखन माळी यांनी तक्रार दाखल केली आहे.

गुटख्याची चोरटी वाहतूक विजापूर नाका पोलिसांनी रोखली

शुक्रवारी(14 ऑगस्ट) पोलीस कॉन्स्टेबल लखन धर्मा माळी व त्यांच्या डीबी पथकाला याबाबत एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. अनोखी शक्कल लढवत एका मोठ्या वाहनात गुटखा साठा सोलापुरातून कर्नाटक कडे विक्रीसाठी जाणार आहे. या माहितीनुसार विजापूर नाका पोलिसांनी आसरा चौक ते मुलतानी बेकरी या दरम्यान 14 ऑगस्ट रोजी दिवसभर सापळा लावला होता.

शुक्रवारी सांयकाळी 6.15 मिनिटांनी अशोक लेलंड ट्रक मुलतानी बेकरी येथून बेसनची भरलेली पोते घेऊन निघाला होता. पेट्रोलिंग करणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आसरा चौक येथे सदर ट्रक( एम. एच. 06 ए. क्यू.8142) अडवला. ट्रक चालकाला वाहनात काय आहे याबाबत विचारणा केली. मात्र, वाहन चालक कल्याणी तेजमने याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणला व अधिक चौकशी केली. ट्रक चालक कल्याणी तेजमाने याने पोलिसी खाक्याला घाबरुन ट्रक मध्ये काय आहे, याची सविस्तर माहिती सांगितली.

गुटखा माफियांनी अनोखी शक्कल लढवत कोणालाही संशय येऊ नये, यासाठी 50 बॅगा गुटखा भरले,त्यानंतर त्यावर 1 लाख 90 हजार रुपयांची बेसनची पोती मुलतानी बेकरी(होटगी रोड) येथून भरली होती.जेणेकरून कुणी तपासले असता त्यामध्ये फक्त बेसन पोती दिसावे. मात्र, पोलिसांना खात्रीशीर माहिती असल्याने ट्रक ताब्यात घेण्यात आला.

पोलिसांनी 21 लाख 60 हजार रुपयांचा के के स्टार नावाचा गुटखा, 1 लाख 90 हजार रुपयांचे बेसन,12 लाख रुपयांचा अशोक लेलंड कंपनीचा ट्रक असा एकूण 35 लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई, सहायक पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील, सपोनि अमित शेटे, पोलीस हवालदार श्रीरंग खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल रोहन ढावरे,आलम बिराजदार, लखन माळी, विशाल बोराडे, बालाजी जाधव, लक्ष्मण वसेकर आदींनी केली.

21 लाख 60 हजार रुपयांचा के के स्टार नावाचा गुटखा कर्नाटक येथील यादगीर येथे जाणार होता. यामधील कल्याणी तेजमने व संजीवकुमार कोळी हे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. नदीम नावाचा संशयित आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा गुटखा यादगीर येथे जाणार होता, हे निष्पन्न झाले आहे. पण, एवढा मोठा गुटखा साठा सोलापूरात कसा आला? कुठून आला याचा तपास चालू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.