ETV Bharat / state

Corona Vaccination : सर्व प्रौढ नागरिकांचे लसीकरण तर ठरलं.. मग जनावरांचे लसीकरण कधी?

author img

By

Published : Jun 9, 2021, 8:33 PM IST

केंद्राने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचे ठरविले. पण लोकांबरोबर पशुधनही तितकेच महत्वाचे आहे. यांचे लसीकरण कधी करणार असा सवाल पशुपालक उपस्थित करत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुभत्या जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे.

vaccination-of animal
vaccination-of animal

सोलापूर - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशातील प्रत्येक जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. प्रत्येक राज्य व जिल्हा आपल्या राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांना वाचविण्यासाठी लसीकरणावर भर देत आहे. अखेर केंद्राने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचे ठरविले. पण लोकांबरोबर पशुधनही तितकेच महत्वाचे आहे. यांचे लसीकरण कधी करणार असा सवाल पशुपालक उपस्थित करत आहेत.

सोलापुरातील अनेक पशुपालक चिंतेत पडले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सोलापुरातील स्थानिक प्रशासन जिल्ह्यातील सर्व जनावरांचे लसीकरण करत होते. मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सोलापुरातील प्रशासनाला गाय वर्ग व म्हैस वर्गातील जनावरांना लसीकरणाचा विसर पडला आहे. मान्सून सुरू होणार आहे, पावसाळ्यात लाळ्या खुरकूत, घटसर्प आदी साथीचे आजार जनावरांना धोकादायक ठरू शकतात तरी देखील या साथीच्या आजारांचे लसीकरण रखडले आहे.

जनावरांचे लसीकरण कधी? पशुपालकांचा सवाल
सोलापुरात 19व्या पशुगणनेनुसार पशुसंख्या -

सोलापुरात 19 व्या पशुगणनेनुसार सोलापुरात गाय वर्गातील पशुसंख्या 7 लाख 30 हजार 461आहे. म्हैस वर्गातील पशुसंख्या 4 लाख 49 हजार 565 आहे. मेंढी वर्गातील संख्या 1 लाख 86 हजार 59 आहे आणि शेळी वर्गातील पशुसंख्या 7 लाख 6 हजार 406 इतकी आहे.

पावसाळ्यापूर्वी लसीकरण होणे आवश्यक -

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुभत्या जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे. पण आजतागायत शहर आणि जिल्ह्यातील एकाही दुभत्या जनावराचे लसीकरण झाले नाही. जास्त पाऊस , दमट किंवा ढगाळ वातावरणामध्ये घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार हे रोग जनावरांना होऊ शकतात. आंत्रविषार हा साथीचा रोग शेळ्या मेंढ्याना होतो तर घटसर्प आणि फऱ्या हा रोग गाय आणि म्हैस वर्गात होतो.

सोलापुरात पहिल्या फेजमध्ये लसीकरण होणार असल्याची माहिती -

जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एस. बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पशूंना पहिल्या फेजमध्ये लसीकरणाबाबत माहिती दिली. घटसर्प या साथीच्या आजारावर 2 लाख 48 हजार लसी आल्या आहेत. फऱ्या रोगावर 64 हजार लसी आल्या आहेत तर आंत्रविषार यावर 3 लाख 44 हजार लसी आल्या आहेत. या लसी तालुक्यातील पशु वैद्यकीय डॉक्टरांना वाटप करण्यात आल्या आहेत. लवकरच लसीकरण केले जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा परिषद येथील जिल्हा पशूधन अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.