ETV Bharat / state

सोशल मीडिया हे प्रभावी अस्त्र, सकारात्मकपणे वापरा - सुभाष देशमुख - use social media wisely- subhash deshmukh

सध्या तुमच्या हातात सोशल मीडियाचे अस्त्र आहे. या माध्यमातून सकारात्मक गोष्टी जनतेसमोर मांडण्यासाठी त्याचा प्रभावीपणे वापर करा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. सोलापुरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सोशल मीडिया कार्यशाळा पार पडली. त्यावेळी सुभाष देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली. या प्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यशाळेस सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.

सोशल मीडियाचे हे प्रभावी अस्त्र सकारात्मकपणे वापरा- सुभाष देशमुख
author img

By

Published : Aug 31, 2019, 9:23 PM IST

सोलापूर - काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्तापर्यंत जनतेला निरक्षर ठेवले. हुशार होऊ दिले नाही. सध्या तुमच्या हातात सोशल मीडियाचे अस्त्र आहे. या माध्यमातून सकारात्मक गोष्टी जनतेसमोर मांडण्यासाठी त्याचा प्रभावीपणे वापर करा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापुरात भाजप युवामोर्चाच्या वतीने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सोशल मीडिया कार्यशाळा पार पडली. या प्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यशाळेस सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सुभाष देशमुख यांनी पहिल्या टप्प्यात दळणवळणासाठी रस्ते विकासावर भर दिला असून, पुढच्या टप्प्यात सिंचन, रोजगार आणि शिक्षण याविषयात प्रगती साधायची असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, ५ वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी भरघोस निधी दिला. भाजपची सत्ता अनेकांच्या योगदानातून मिळाली असून, कोणावर टीका टिप्पणी न करता विकासकामांच्या माध्यमातून जनतेला आपलेसे करा, असे आवाहन देशमुख यांनी तरुणांना केले.

या कार्यक्रमाप्रसंगी मनीष देशमुख यांनी प्रास्ताविका दिली. त्यात त्यांनी सोशल मीडियाच्या योग्य आणि प्रभावी वापरामुळे अमेरिकेत बराक ओबामांच्या नंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवर्तन घडवून आणल्याचे सांगितले. २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवून सत्ता स्थापनेनंतर २०१९ ला लोकसभेत ५ वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे सोशल मीडियातून पोहचवण्यात यश मिळाले. आणि आता विधानसभा २०१९ ला आपल्या सर्वांना आणखी जोमाने निवडणुकीला सामोर जायचे आहे. यावेळी आपल्याकडील विकासकामांचे गाठोडे जनतेसमोर सोशल मीडियातून मांडायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Intro:mh_sol_04_bjp_social_media_sabha_7201168

सोशल मीडियाचे प्रभावी अस्त्र सकारात्मकपणे वापरा- सुभाष देशमुख
सोलापूर-

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्तापर्यंत जनतेला निरक्षर ठेवलं, हुशार होऊ दिलं नाही, सध्या तुमच्या हातात सोशल मीडियाचं अस्त्र आहे, त्याचा सकारात्मक गोष्टी जनतेसमोर मांडण्यासाठी प्रभावीपणे वापर करा असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.Body:सोलापूरात भाजप युवामोर्चाच्या वतीने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ सोशल मीडिया कार्यशाळा पार पडली, त्यावेळी सूभाष देशमुख बोलत होते. प्रसंगी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेस सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ना. सुभाष देशमुख यांनी पहिल्या टप्प्यात दळणवळणासाठी रस्ते विकासावर भर दिला असून, पुढच्या टप्प्यात सिंचन, रोजगार आणि शिक्षण याविषयात प्रगती साधायची आहे. ५ वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी भरघोस निधी दिला. भाजपची सत्ता अनेकांच्या योगदानातून मिळाली असून, कोणावर टीकाटिप्पणी न करता विकासकामांच्या माध्यमातून जनतेला आपलेसे करा असे आवाहन देशमुख यांनी यावेळी यूवकांना केले.

यावेळी मनीष देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून सोशल मीडियाच्या योग्य आणि प्रभावी वापरामुळे अमेरिकेत बराक ओबामा यांच्या नंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवर्तन घडवून आणल्याचे सांगितले. २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवून सत्ता स्थापनेनंतर २०१९ ला लोकसभेत ५ वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे सोशल मीडियातून पोहचवण्यात यश मिळालं आणि आता विधानसभा २०१९ ला आपल्या सर्वांना आणखी जोमाने निवडणुकीला सामोरे जायचे आहे, यावेळी आपल्याकडे विकासकामांचे गाठोडे जनतेसमोर सोशल मीडियातून मांडायचे आहे असे सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.