ETV Bharat / state

सोलापुरला अवकाळीचा तडाखा; फळबागांचे मोठे नुकसान, त्वरीत पंचनाम्याची मागणी

दुष्काळ,अतिवृष्टी आणि आता पुन्हा अवकाळी पाऊस त्यामुळे इथला शेतकरी आणि त्याची शेती पुन्हा एकदा निसर्गाच्या तापडीत सापडली आहे. यावर्षी शेती द्राक्ष पिकाला चांगला दर मिळेल अशी आशा होती. पण, कालच्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

untimely-rain-coming-in-solapur-city-and-district-grape-gardens-losses
सोलापुरात अककाळी पाऊस...
author img

By

Published : Mar 2, 2020, 9:27 AM IST

सोलापूर- जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभर कष्ट करुन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. यात द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापुरात अककाळी पाऊस...

हेही वाचा- सांगलीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; द्राक्ष बागांना फटका

शेतकरी कमी पाण्याच्या भागात खास करुन कांदा आणि भुसार धान्य उत्पादीत करतो. मात्र, अलीकडे मोठ्याप्रमाणात फळबागांची लागवड होत आहे. शेतीत गुंतवणूक वाढली आहे. अशा परिस्थितीत काल रात्री अकरानंतर अचानक विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. यात द्राक्ष, डाळींब, केळी, आंबा, लिंबू, ऊस, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे.

शनिवारी मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, तर सर्वात जास्त द्राक्ष बागांना बसला आहे. काढणीला आलेल्या द्राक्षाच्या घडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे द्राक्ष घडात फंगस पकडणार आहे. तर ज्वारीचे पीक काळे पडत असून कडबाही काळा पडला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आज पासून द्राक्ष घडातील द्राक्ष मणी तडकण्यास सुरुवात होतील. द्राक्ष काढणीला आलेल्या घडामध्ये साखरेचे प्रमाण ज्यादा असते. यामुळे मधमाशा व इतर माशा तडकलेल्या मण्यातील रसाचे शोषण करतात. गेल्यावर्षीच्या अवकाळी पावसाने द्राक्ष छाटणीस विलंब झाला होता. आता पुन्हा हाती आलेले द्राक्षाचे पीक अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडले आहे.

दुष्काळ,अतिवृष्टी आणि आता पुन्हा अवकाळी पाऊस त्यामुळे इथला शेतकरी आणि त्याची शेती पुन्हा एकदा निसर्गाच्या तापडीत सापडली आहे. यावर्षी शेती द्राक्ष पिकाला चांगला दर मिळेल अशी आशा होती. पण, कालच्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नुकसान पिकांचे तत्काळ पंचनामे करुन शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.