पंढरपूर (सोलापूर)- करमाळा तालुक्यातील पोथरे येथील कमल काळे यांची खरीप हंगामात अडीच एकर क्षेत्रात पिकलेली २० क्विंटल तूर कापणी करण्यासाठी एकत्रित जमा केली होती. शेतातील अडीच एकरातील मळणी करण्यासाठी गोळाकरून ठेवलेल्या तुरीच्या पीक अज्ञाताने पेटून दिले. यात २० किंटल तुरीचे एक लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रकरणी पोलिसात गोपीनाथ पाटील यांनी तक्रार दिली आहे.
आगीत तूर जळून खाक..
कमल पाटील यांनी काबाडकष्ट करून मळणी करण्यासाठी शेतामध्ये एकत्रित गोळा करून ठेवली होती. तूर शेतातच असल्याने तुरीच्या शेजारी कोणी नसल्याचा अंदाज घेऊन अज्ञात व्यक्तीने पहाटे जाऊन तुरीच्या पिकाला पेटवून दिले. या आगीत पूर्ण तूर जळून खाक झाली आहे. सकाळी शेतात आल्यानंतर कल्याण पाटील यांना तूर जळालेल्या अवस्थेत दिसून आली. या प्रकरणी पोलीस पाटील यांनी कामगार तलाठी व पोलिसांना कळविल्यानंतर तलाठी मयूर क्षीरसागर, रवींद्र जाधव यांनी पंचनामा केला.
ग्रामस्थांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी-
कमल पाटील यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीची पंचनामा वर प्रकाश पाटील, नवनाथ झिंजाडे, शांतीलाल रोही, कल्याण पाटील, हनुमंत शिंदे आदींनी पंच म्हणून उपस्थित होते. सदर घटनेचा गावातून तीव्र निषेध केला जात आहे. पोलीस यंत्रणेने संबंधित व्यक्तीचा तपास करून त्यावर कठोर कारवाई करावी आशी मागणी केली जात आहे.