ETV Bharat / state

बार्शीत बेरोजगार तरुणांची १ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक - बार्शीत तरुणांना एक कोटींचा गंडा

बार्शीत फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा.लि. या मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून १ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करावी असे आदेश येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत.

youth cheated of Rs 1 cror
बेरोजगार तरुणांची १ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक
author img

By

Published : Dec 20, 2020, 8:52 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - बेरोजगार तरुणांना वेगवेगळी शक्कल लढवून फसविण्याचे अनेक प्रकार घडतात. तसाच प्रकार बार्शीत देखील घडला आहे. फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा.लि. या मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून १ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. बार्शी तालुक्यातील 114 बेरोजगार तरुणांना यामध्ये फसवण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करावी असे आदेश येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाकडून सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचा आदेश -

प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश येथील सत्र न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी पोलिसांना दिले आहेत. फसवणूक झालेल्यांमध्ये मिथिलेश मिलिंद दीक्षित व त्यांचे मित्र परिवार ( सर्व रा . बार्शी ) यांचा समावेश आहे . याबाबत येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायाधीश ए . बी . भस्मे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा.लि.राधेशामजी सथार ( रा.हिस्सार हरियाणा), बन्सीलाल सिहांग (रा.अहमदपूर, फतेहबाद ), जयराम अहिलजी शिंदे ( रा . खेडले काजळी, ता.नेवासा ), सागर उत्तम घोलप ( रा. मोशी पुणे ), आदिल दस्तगीर सय्यद (रा . शेंद्री , ता . बार्शी ), ज्ञानोबा जाधवर ( रा. चुंब, ता . बार्शी ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायाधीश भस्मे यांनी बार्शी पोलिसांना दिले आहेत.

कंपनीने अशा प्रकारचे आमिष दाखवून केलेली लूट

फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा.लि.या हरियाणा स्थित कंपनीचा चेन ऑफ सुपर मार्केटिंगचा भारतातील २३ राज्यात व्यवसाय होता. सात हजार रुपये कंपनीत जमा केले तर दोन नवीन सभासद करायचे अन्‌ दरमहा कंपनी तुम्हाला 1 हजार 500 रुपये देईल, 1 लाख 95 हजार गुंतवले तर दरमहा 24 हजार रुपये तर 3 लाख गुंतवणूक केली तर दरमहा 48 हजार रुपये कंपनी परतावा करेल. तसेच तीन वर्षांनी मूळ भरलेली रक्कम मिळेल, असे आमिष कंपनीकडून दाखवण्यात आले होते. तालुक्‍यातील 114 तरुणांनी येऊन सुमारे 1 कोटी 43 लाख रुपये गुंतवले होते. परंतु कबुल केल्याप्रमाणे कंपनी व एजंटांकडून गुंतवणूकदारांना परतावा न मिळाल्याने कंपनी विरोधात भारतात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. कंपनी बंद पडल्याने गुंतवणूकदार मिथिलेश दीक्षित यांची पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने बार्शी येथील सत्र न्यायालयात त्यांनी धाव घेतली. यात गुंतवणूकदार, फिर्यादी यांच्यावतीने अॅड . प्रशांत एडके , अॅड . समाधान सुरवसे , अॅड. सुहास कांबळे व अॅड. सर्फराज इनामदार, ॲड. सूरज वाणी यांनी काम पाहिले .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.