ETV Bharat / state

नागपंचमीनिमित्त सालोपूरमध्ये महिलांसाठी 'उंच माझा झोका' उपक्रमाचे आयोजन

author img

By

Published : Aug 6, 2019, 9:34 AM IST

Updated : Aug 6, 2019, 2:23 PM IST

शहरी महिलांना नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करता यावा म्हणून सोलापूर महानगर पालिकेच्यावतीने 'उंच माझा झोका' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नागपंचमीनिमित्त सालोपूरमध्ये महिलांसाठी 'उंच माझा झोका' उपक्रमाचे आयोजन

सोलापूर - शहरी महिलांना नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करता यावा म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने 'उंच माझा झोका' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने हा सामूहिक नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.

महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय महिला नगरसेविकांनी नागपंचमीनिमित्त गाण्यांवर फेर धरत उपक्रमाचा आनंद लुटला. भारतीय महिलांच्या आस्थेचे प्रतीक असणारा श्रावण महिन्यातील हा सण सांस्कृतिक वारसा आहे. त्याची जपणूक करण्यासाठीच आपण हा उपक्रम घेतल्याचे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुमुद अंकाराम यांनी सांगितले. तर महापौरांनी यांसारखे उपक्रम आपण कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

नागपंचमी निमित्त झोके बांधण्यासाठी शहरात आता पूर्वीसारखी भली मोठी झाडे नाहीत. त्यात करमणुकीची साधने वाढल्यामुळे पारंपरिक सण-उत्सवांकडे महिलांचा ओढा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे कृत्रिम सांगाडे लावून साजरी झालेली नागपंचमी महिलांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली आहे.

Intro:सोलापूर : शहरी महिलांना नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करता यावा म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने उंच माझा झोका या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने हा सामूहिक नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.Body:महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्वतः या उपक्रमाचं उदघाटन केलं. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय महिला नगरसेविकांनी नागपंचमीनिमित्त गाण्यांवर फेर धरला, झोक्याचा आनंद लुटला. भारतीय महिलांच्या आस्थेचं प्रतीक असणारे आपले श्रावणातील हे सण सांस्कृतिक वारसा आहेत.त्याची जपणूक करण्यासाठीच आपण हा उपक्रम घेतल्याचे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुमुद अंकाराम यांनी सांगितलं, तर महापौरांनी हे उपक्रम आपण कायम ठेवणार असल्याचं म्हंटलय....Conclusion:नागपंचमी निमित्त झोके बांधण्यासाठी शहरात आता पूर्वीसारखी भली मोठी झाडं नाहीत. करमणुकीची साधनं वाढल्यामुळे पारंपरिक सण उत्सवांकडे महिलांचा ओढा कमी झालेला असताना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमांमुळं कृत्रिम सांगाडे लावून का होईना पण साजरी झालेली नागपंचमी महिलांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरलीय...
Last Updated : Aug 6, 2019, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.