सोलापूर - देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी इंग्रजांच्या प्रभावातून भारतीय नागरिक बाहेर पडले नसल्याचे दृश्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात पाहायला मिळाल आहे. दीक्षांत सोहळ्यात देशी पेहरावांचा वापर करावा या युजीसीच्या सूचनेला केराची टोपली दाखविण्यात आली.
स्वातंत्र्य लढ्यात हाताने तयार केलेल्या आणि चरख्यावर कातलेल्या सुताच्या कपड्यांनी शस्त्रांची भूमिका बजावली होती. त्यातच सध्या देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने विद्यापीठ अनुदान मंडळ म्हणजे युजीसीने देशभरातील राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना भारतीय पोशाखांसह खादीच्या कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर युजीसीच्या सचिवा रजनी जैन यांनी या संदर्भातील परिपत्रकही काढले आहे. असे असताना पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू आणि दीक्षांत सोहळा संयोजन समितीने युजीसीच्या परिपत्रकाला हरताळ फाससले.
ब्रिटीश कॅप अन गाऊनसंदर्भात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना विचारल्यावर त्यांनी कॅमेऱ्यासमोर न येता देशी पेहरावाबाबत मक्तेदारांनी ऐनवेळी ऑर्डर देण्यास नकार दिल्याने जुन्या ब्रिटीश पेहरावात दीक्षांत सोहळा पार पडल्याचा खुलासा केला आहे.
हेही वाचा - ब्रिटिशकालीन मंडईचे रूपडे पालटणार, लक्ष्मी मंडई होणार अत्याधुनिक