सोलापूर - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना करमाळा विधासभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार रश्मी बागल यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (सोमवार) दुपारी करमाळा येथे सभा होणार आहे.
करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून सभेची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. व्यासपीठाची उभारणी करण्यात आली असून या सभेसाठी महिलांची बसण्याची सुविधा देखील स्वतंत्र करण्यात आली आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
हेही वाचा - 'संधी दिली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता येईल'