सोलापूर - अंदमानमधील पोर्टब्लेअर येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी राज्य फुटबॉल संघाची (१९ वर्षाखालील) निवड करण्यात आली आहे. या संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. नुकतीच ही निवड प्रक्रिया पार पडली असून संघाचे सराव शिबिर सोलापूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात पार पडले.
राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा पोर्टब्लेअर येथे १९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९ या कालावधीत होणार आहेत. नुकतेच जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या जिल्हा क्रीडा कार्यालय येथे प्रशिक्षण पार पडले. या शिबीरात मुंबई शहरचे सुमित पाटील आणि संघ व्यवस्थापक अनिल सुरेकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शक केले.
असा आहे १९ वर्षाखालील राज्य फुटबॉल संघ -
अविष्कार राऊत, विराज साळोखे, निरंजन कामते, विशाल पाटील, जय कामत, मोहम्मद अन्सारी, तुषार देसाई, शेख मोहम्मद शेख फिरोज, रुतीक अहिरराव, शुभकांत मेहरा, सुरुज मौर्या, आर्यन शिर्के, अन्सारी अरमाश, लक्ष पाटील, बलराज कुत्तल, रानजॉय बनिक आणि धनुष मनोज सानप.
हेही वाचा - स्टेडियममध्ये वीज पडून खेळाडूचा मृत्यू, दोन युवा खेळाडू बचावले
हेही वाचा - मराठमोळ्या अजिंक्यला पडतायेत गुलाबी स्वप्न, विराट-शिखरने केलं ट्रोल