ETV Bharat / state

साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतणाऱ्या दोघांवर काळाचा घाला - Solapur road accident

साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतणाऱ्या दोघांवर काळाने घाला घातला. सिमेंट टँकरने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात खोमनाळ येथे शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली.

पंढरपूर
पंढरपूर
author img

By

Published : Dec 6, 2020, 4:55 PM IST

पंढरपूर - साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतत असताना पाटखळ गावाजवळ सिमेंट टँकरने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे ठार झाले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात खोमनाळ येथे शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली. गोविंद बुरुंगे आणि चिल्लपा बुरुंगे अशी मृताची नावे आहेत.

गोविंद आणि चिल्लपा हे दोघे खोमनाळ हिवरगाव येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याला गेले होते. गोविंद बुरुंगे व चिल्लपा बुरुंगे हे दोघे बुरुंगेवाडी, जवळा या आपल्या गावाकडे खोमनाळ, हिवरगाव परिसरातील साखरपुडा उरकून दुचाकीवरून (एमएच 9 एएच 9218) परत जात होते. ते पाटखळ गावाजवळ आले असता त्यांची समोरून येणार्‍या सिमेंट टँकर (केए 48-5122) ला जोरदार धडक बसली. दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना सांगोल्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या घटनेनंतर बुरुंगेवाडी जवळा येथे शोककळा पसरली आहे.

कुरुल-मोहोळ महामार्गावर अपघात -

यापूर्वी 22 नोव्हेंबरला कुरुल-मोहोळ महामार्गावर ज्वलनशील केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकर व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला होता. यामध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. तीन तासांच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.