ETV Bharat / state

Truck overturned at Pandharpur : ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, एका बैलाचा मृत्यू

सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू झाला आहे. 15 ऑक्टोबर पासून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाले असून. अनेक ऊसतोडणी मजूर आपल्या गावाकडून पश्चिम महाराष्ट्रात येत ( truck carrying sugarcane workers overturned ) आहेत.

Truck overturned at Pandharpur
Truck overturned at Pandharpur
author img

By

Published : Oct 29, 2022, 4:10 PM IST

सोलापूर : सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू झाला आहे. 15 ऑक्टोबर पासून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाले असून. अनेक ऊसतोडणी मजूर आपल्या गावाकडून पश्चिम महाराष्ट्रात येत ( truck carrying sugarcane workers overturned ) आहेत. काल रात्री सव्वादोन वाजता ऊसतोडणी कामगारांना घेऊन जाणारा MH 12 FC 9829 एक ट्रक सोनके तालुका पंढरपूर येथे पलटी झाला ( Truck overturned at Pandharpur ) आहे. या झालेल्या अपघातामध्ये एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

ड्रायव्हरने पळ काढला : अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर पळून गेला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. ट्रक ड्रायव्हर मद्यधुंदीत गाडी चालवत होता असं प्रत्यक्ष दर्शींकडून सांगण्यात येत आहे. या झालेल्या अपघातामुळे काही काळ या परिसरात तणावाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. या अपघातात एक बैल गंभीर जखमी झाला ( One bull died in accident ) आहे. बीडवरून हा ट्रक राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली . या ट्रकमध्ये एकूण नऊ माणसे होती, ती माणसे ट्रकच्या केबिनमध्ये बसली असल्यामुळे सुदैवाने त्यांच्यासोबत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

जखमींवर उपचार : अपघात झाल्यानंतर परिसरामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला तेव्हा स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत जखमींना बाहेर काढून त्यांना प्रथामोपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.