ETV Bharat / state

उसाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चंद्रभागा नदीत कोसळला, चालक गंभीर जखमी - tractor collapses in bhima river

नियंत्रण सुटल्याने ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्‍टर पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात कोसळला. यामध्ये चालक सतीश कडाळे हा गंभीर जखमी झाला आहे.

tractor and  trolley collapses in bhima river
उसाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चंद्रभागा नदीत कोसळला, चालक गंभीर जखमी
author img

By

Published : Dec 17, 2020, 5:06 AM IST

पंढरपूर - खेडभोसे येथून ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्‍टर पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात कोसळला. यामध्ये चालक सतीश कडाळे (रा. भोसे, ता. पंढरपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये ट्रॅक्‍टर व दोन ट्रॉलींसह उसाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झालेला पाहून बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी चालकाला बाहेर काढले. त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान
भोसे येथील शेतकरी धनाजी विठ्ठल साळुंखे यांचा ट्रॅक्टर ऊस घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. पटवर्धन कुरोली बंधाऱ्यावर आल्यानंतर दोन्ही ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरल्याने उतारावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे तो सरळ बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात पडला. ट्रॅक्टर चालक तब्बल दोन तास उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली अडकून होता. या ट्रॅक्‍टरचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जड वाहतूक बंद करण्याची मागणी
बंधाऱ्यावरून जड वाहतुकीसाठी बंदी असताना सुद्धा येथून मोठ्या प्रमाणात मुरूम, खडी, ऊस वाहतूक केली जाते. या वाहतुकीमुळे या बंधाऱ्यावर अनेक वेळा अपघात घडले आहेत. या बंधाऱ्यावरील जड वाहतूक बंद करावी, यासाठी येथील अनेक सामाजिक संघटनांनी निवेदनेही दिली आहेत. यापूर्वीही रस्ता अरुंद असल्याने वाहने नदीत पडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे ही जड वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिक, शेतकऱ्यांमधून करण्यात येत होती. मात्र पोलीस, पाटबंधारे प्रशासन दखल घेत नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हेही वाचा - रणजितसिंह डिसले यांना मिळालालेला पुरस्कार राज्यासह देशाचा गौरव : सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

हेही वाचा - सोलापूरमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर, अनेक भागात ड्रेनेज व्यवस्था नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.