ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाचा कहर : एकाच दिवशी 48 रुग्णांची वाढ, बाधितांची संख्या 264वर - corona patient news

सोलापुरात आज एका दिवसात तब्बल 48 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 264वर पोहोचला आहे.

edited photo
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : May 10, 2020, 9:10 PM IST

Updated : May 11, 2020, 10:12 AM IST

सोलापूर - सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 264वर पोहोचली आहे. आज तब्बल 48 पॉझिटिव्ह नवे रूग्ण एका दिवसात आढळून आले आहेत. आतापर्यंत मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत एकूण 3 हजार 124 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील 2 हजार 972 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 2 हजार 708 निगेटिव्ह तर 264 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज एका दिवसांत 132 अहवाल प्राप्त झाले यातील 84 अहवाल निगेटिव्ह तर 48 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापुरात ही एका दिवसातील आजवरची सर्वात मोठी पॉझिटिव्ह संख्या आहे. आज 48 जणांमध्ये 29 पुरूष तर 19 महिलांचा समावेश आहे. तर आज केगांव केंद्रातून 148 जणांना मुदत संपल्याने घरी सोडण्यात आले. तर रूग्णालयातून 12 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज 9 पोलीसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सर्वजण ग्रामीण पोलीस दलातील आहेत.

आज ज्या भागातून रूग्ण मिळाले ते भाग पुढीलप्रमाणे - संजीवनगर एमआयडीसी, गजानन नगर जुळे सोलापूर, बजरंग नगर होटगी रोड, सम्राट चौक आंबेडकर उद्यानजवळ, मंत्री चंडक पोलीस कॉलनी, रविवार पेठ, पोलीस वसाहत मुरारजी पेठ, समृध्दी हेरिटेज जुळे सोलापूर, निर्मिती टॉवर मोदी खाना, अश्विनी हॉस्पिटल ग्रामीण कुंभारी, लोकसेवा शाळेजवळ, बुधवार पेठ मिलिंद नगर, तेलंगी पाच्छा पेठ, तुळशांती नगर विडी घरकुल, सिध्दार्थ चौक कुमारस्वामी नगर, नीलम नगर, मोदीखाना, गवळी वस्ती कुंभारी रोड, कुंभारी नाका, शासकीय हॉस्पिटल कॉर्टर, मुलींचे वसतीगृह होटगी नाका, सहारा नगर मजरेवाडी, शिवाजीनगर मोदी, पाटकूल (ता. मोहोळ), धाकबाभुळगांव (ता. मोहोळ), सावळेश्वर (ता. मोहोळ) येथे प्रत्येकी 1 रूग्ण आढळला आहे.

सिध्देश्वर पेठ येथे 6 पुरूष, 2 महिला, सदर बझार लष्कर येथे 2 पुरूष, 2 महिला, शास्त्रीनगर येथे 3 पुरूष, 4 महिला, हुडको कॉलनी कुमठा नाका 1 पुरूष, 1 महिला यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 264 मध्ये 152 पुरूष तर 112 महिला आहेत. मृतांची संख्या 14 आहे तर रूग्णालयातून आत्तापर्यंत 41 जण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा - सोलापुरातील 981 परप्रांतीय तामिळनाडूला रवाना, पंढरपूर ते तिरूचिरापल्ली धावली स्पेशल रेल्वे

Last Updated : May 11, 2020, 10:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.