ETV Bharat / state

उजनी धरणातील ३८ बोटी जिलेटीन लावून उडविल्या - धरण

उजनी धरणातील वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यासह जवळपास कोठेही अधिकृत वाळूचा मोठा ठेका नसल्यामुळे आता वाळू माफिया हे उजनी धरणातून वाळू चोरी करत आहेत.

उजनी धरण
author img

By

Published : Mar 15, 2019, 8:41 PM IST

सोलापूर - उजनी धरणातून बेकायदा वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उजनी धरणामध्ये यांत्रिक बोटी टाकून वाळू उपसा करणाऱ्या ३८ यांत्रिक बोटी जिलेटीन लावून उध्वस्त करण्यात आल्या आहेत. उजनी जलाशयातील वाळूमाफियावर करमाळा, दौंड, इंदापूर या ३ तहसिल कार्यालयाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

उजनी धरण

उजनी जलाशयात वाळूमाफियांवर कारवाईचे सत्र सुरू असले तरी रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळू उपसण्याचा सपाटा वाळू माफियांनी लावला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. वाळू माफिया हद्दीचा फायदा घेत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई होत नव्हती. मात्र करमाळा, इंदापूर,दौंड, करमाळा या ३ तहसील कार्यलायाच्या संयुक्त विद्यमाने उजनी जलाशयात वाळू चोरीवर मोठी कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ३८ बोटी जिलेटिन च्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यामुळे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत उध्वस्त करण्यात आला. ३८ बोटी एकाच वेळी कारवाई करून उद्ध्वस्त केल्याने उजनी जलाशयातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. उजनी जलाशयात वाळू माफियांवर कारवाई होत असताना वाळू माफिया नेहमी त्या गावाची हद्द ओलांडून दुसऱ्या तालुक्याच्या हद्दीत जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात अडचण येत होती. त्यामुळे संयुक्त कारवाई केल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर बोटी उध्वस्त करता आल्या आहेत.

या कारवाईमध्ये करमाळयाचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी, केतूर महसूल मंडलाधिकारी सुहास बदे, संजय शेटे, एस.यु. डिकोळे, सुरेश राऊत, विवेक कसबे, टी. बी. मोरे, मयूर गावडे, आर. एच. माने, आनंद ढोणे, या तलाठ्यांसह औट पोस्टचे समीर खैरे कात्रज पोलीस पाटील सोमनाथ पाटील आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

Intro:R_MH_SOL_01_15_ACATION_ON_SAND_S_PAWAR
उजनीतील वाळू माफियांवर तीन तहसील कार्यालयाची कारवाई,
उजनी धरणातील 38 बोटी जिलेटीन लावून उडविल्या
सोलापूर -
उजनी धरणातून बेकायदा वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उजनी धरणामध्ये यांत्रिक बोटी टाकून वाळू उपसा करणाऱ्या तब्बल 38 यांत्रिक बोटी जिलेटीन लावून उध्वस्त करण्यात आल्या आहेत. उजनी जलाशयातील वाळूमाफियावर करमाळा, दौड, इंदापूर या तीन तहसिल कार्यालयाने ही संयुक्त कारवाई केली आहे. Body:उजनी धरणातील वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यासह जवळपास कोठेही अधिकृत वाळूचा मोठा ठेका नसल्यामुळे आता वाळू माफिया हे उजनी धरणातून वाळू चोरी करत आहेत. उजनी जलाशयात वाळूमाफियांवर कारवाईचे सत्र सुरू असले तरी रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळू उपसण्याचा सपाटा वाळू माफियांनी लावला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत होता आणि वाळू माफिया हदीचा फायदा घेत असल्याने यांच्यावर कठोर कारवाई होत नव्हती मात्र करमाळा, इंदापूर,दौंड, करमाळा तहसील कार्यलायाच्या संयुक्त विद्यमाने उजनी जलाशयात वाळू चोरीवर मोठी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत 38 बोटी जिलेटिन च्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या त्यामुळे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत उध्वस्त करण्यात आला आहे 38 बोटी एकाच वेळी कारवाई करून उद्ध्वस्त केल्याने उजनी जलाशयातील ही सर्वात मोठी कारवाई आहे उजनी जलाशयात वाळू माफियांवर कारवाई होत असताना वाळू माफिया नेहमी त्या गावाची हद्द ओलांडून दुसऱ्या तालुक्याच्या हद्दीत जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात अडचण येत होती त्यामुळे संयुक्त कारवाई केल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर बोटी उध्वस्त करता आल्या आहेत.
या कारवाई मध्ये करमाळयाचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर,इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी, केतूर महसूल मंडलाधिकारी सुहास बदे, संजय शेटे, एस.यु. डिकोळे, सुरेश राऊत, विवेक कसबे, टी बी मोरे, मयूर गावडे, आर. एच माने, आनंद ढोणे, या तलाठ्यांसह औट पोस्टचे समीर खैरे कात्रज पोलीस पाटील सोमनाथ पाटील आदि कर्मचारी सहभागी झाले होते.Conclusion:R_MH_SOL_01_15_ACATION_ON_SAND_S_PAWAR या फाईल नेमने सोबत एक फोटो आणि व्हीडीओ पाठविले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.