ETV Bharat / state

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना वेतन नाही; अमित देशमुखांकडे मानधनासह विमा संरक्षणाची केली मागणी - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर आणि नर्सचा तुटवडा जाणवला. या काळात सेवा देणाऱ्या प्रत्येकाला सेवेचा मोबदला देखील मिळाला. पण, काही डॉक्टरांना गेल्या वर्षभरापासून एक रुपयाही वेतन मिळालेले नाही. यासंदर्भात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदन देऊन, कोविड ड्युटीचे मानधनासह विमा संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना वेतन नाही; अमित देशमुखांकडे मानधनासह विमा संरक्षणाची केली मागणी

author img

By

Published : Jun 1, 2021, 2:07 AM IST

सोलापूर - कोरोना महामारीच्या पाहिल्या लाटेने आणि आता दुसऱ्या लाटेनेही सोलापुरात चांगलेच थैमान घातले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील शिपाई ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येकाला भयंकर असा ताण निर्माण झाला आहे. प्रत्येक शासकीय नोकरदाराला कोरोना सेवेत बोलावण्यात आले आहे. या महामारीच्या काळात बऱ्याच ठिकाणी डॉक्टर आणि नर्सचा तुटवडा जाणवला. परंतु, या काळात सेवा देणाऱ्या प्रत्येकाला याचा मोबदला मिळासेला आहे. मात्र, या महामारीत अहोरात्र काम करणाऱ्या अनेक डॉक्टरांना गेल्या वर्षभरापासून एक रुपया देखील वेतन मिळालेले नाही. (31 मे) रोजी वैद्यकीय क्षेत्रात फुकट कोरोना ड्युटी बजावणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदन देऊन कोविड ड्युटीचे मानधनासह विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना वेतन नाही; अमित देशमुखांकडे मानधनासह विमा संरक्षणाची केली मागणी

अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत नाही वेतन

सोलापूर शहराजवळ अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय आहे. येथे एमबीबीएसचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. (2016)ला पास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांची अश्विनी रुग्णालयात इंटर्नशिप सुरू आहे. पण गेल्या वर्षभरापासून सोलापूरसह देशात कोरोना महामारीने एकच धुमाकूळ घातला आहे. इंटर्नशिप सुरू असलेल्या या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना देखील अश्विनी महाविद्यालय प्रशासनाने अश्विनी सहकारी रुग्णालयात कोविड ड्युटी लावली आहे. पण या सर्व विद्यार्थ्यांना विना वेतन किंवा विना कोविड भत्ता आणि कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही. या सर्व मागण्या करत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांकडे वेतन, कोविड भत्ता आणि विमा संरक्षणची मागणी केली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे मागणी केली आहे की, 11 हजार रुपये वेतन मिळावे, कोविड भत्ता म्हणून मासिक 30 हजार रुपये देण्यात यावे. तसेच विमा संरक्षण द्यावे.

पॅरामेडिकल विद्यार्थी देखील विद्यावेतनापासून वंचित

सोलापूर येथील डॉ. वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी (BPMT) च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात इंटर्नशिपवेळी विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जात नाही. तसेच, शासनाकडून विद्यावेतन देण्यासंबंधी मंजुरी नसल्याची माहिती शासकीय मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून सांगितली जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. तर, शासनाने पॅरामेडिकल मधील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या वेळी विद्यावेतन द्यावे अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

विद्यार्थ्यांना तीन महिने शासकीय रुग्णालयात प्रॅक्टिस करण्यास मंजुरी द्यावी

सोलापुरात एक आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षण पासून वंचित न ठेवता 3 महिने प्रशिक्षण पूर्वी प्रमाणे देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अमित देशमुख यांकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.