पंढरपूर - करमाळा तालुक्यातील जिंती येथील जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी भोसले यांचे घर चोरट्यांनी फोडले. यावेळी देवघरात पुजेसाठी ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिण्यासह इतिहासकालिन नानी व रोकड असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद-
जिंती गावात रविवारी पहाटे सव्वातीन वाजता चोरांनी सवितादेवी भोसले यांच्या वाड्यामध्ये चोरी केली. लक्ष्मी पूजनानिमित्त त्यांनी देवघरात दागिने व पैशाचे पूजन केले होते. हे पूजन केलेले पैसे व दागिने चोरांनी पळवले आहेत. वाड्यामध्ये सीसीसीटीव्ही असल्यामुळे हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. लक्ष्मी पूजनानिमित्त देवघरात दागिने व पैशांची पूजा केली होती. मी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलो असता, मला देवघराच्या खिडकीपाशी अनोळखी इसम दिसला. मी आवाज दिल्यानंतर तो पळाला. ते एकूण सहाजण होते, असा अंदाज सवितादेवी भोसले यांचे पती राजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले-
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला जाणे तसेच जनावरांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. जिंती गावात पोलीस औटपोस्ट असूनसुद्धा चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा चोरट्यांना धाक राहीलेला नाही, हे या घटेवरून स्पष्ट होत आहे.
हेही वाचा- 'जैश'च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई