पंढरपूर: पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विकास पाखरे (वय २७, रा. बादलकोट, ता.पंढरपूर) हा टेंम्पो मालक व चालक होता. तो दररोज बारामती ते मंगळवेढा या रस्त्याने बारामतीहुन पशुखाद्याची वाहतुक करायचा. त्याचे गावातील एका महिलेबरोबर अनैतिक संबध ( immoral relationship) असल्याचा संशय आरोपींना होता त्यावरुन त्यांनी शुक्रवारी रात्री विकासचा खुन (The young man murdered ) करुन त्याचे हात-पाय दोरीने सिमेंटच्या खांबाला बांधले व मृतदेह पुणे व सोलापूर जिल्हातील सिमेवरील कुरवली गावाजवळ नीरा नदीच्या पुलावरुन नदीत फेकला. रविवारी सकाळी त्या भागातील नागरिकांना नीरा नदीच्या पात्रात मृतदेह तरंगताना दिसला त्यांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून तपास केला. हा खुनाचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेच पासाची चक्रे फिरवून ४८ तासाच्या आतमध्येच मृतदेहाची ओळख पटवली आणि खुनाचा छडा लावला, आणि पाच जणावर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. या घटनेत विकास पाखरे या युवकाचा अनैतिक संबधातून खुन करण्यात आल्याचे समोर आहे. याप्रकरणी नवनाथ श्रीधर नवले, सचिन श्रीधर नवले, महेंद्र आटोळे, दादा हगारे, साधना नवले (रा.सर्वजन रा. बादलकोट,पो.करकंभ, ता.पंढरपूर) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : बहिणीचा खून करुन पुरावे नष्ट करणाऱ्या भावाला अटक