ETV Bharat / state

दर दिवशी 100 जणांना दिली जाणार लस - datta bharne news

दत्ता भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कोरोना लस आणि बर्ड फ्ल्यू यावर माहिती देत माध्यमांशी संवाद साधला.

solapur
solapur
author img

By

Published : Jan 13, 2021, 7:37 PM IST

Updated : Jan 13, 2021, 9:11 PM IST

सोलापूर - सोलापुरात आज कोरोना प्रतिबंधक लस पोहोचणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 16 केंद्रावर त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दत्ता भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कोरोना लस आणि बर्ड फ्ल्यू यावर माहिती देत माध्यमांशी संवाद साधला.

34 हजार जणांना कोरोना लसीकरण केले जाणार

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला कोरोना लसीकरणची व्यवस्था केली आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यात मात्र दोन ठिकाणी याची व्यवस्था केली आहे. शहर व जिल्हा असे मिळून 16 ठिकाणी कोरोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज 100 जणांना लसीकरण केले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात 34 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना व कोरोना वारीयर याना लस टोचली जाणार आहे.ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस मध्ये ठेवली जाणार आहे.

फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली जाणार लस

कोरोना वॉरियर किंवा कोविड ड्युटी बजावणारे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. सुरुवातीला वैद्यकीय कर्मचारी, त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी, महापालिका व जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे.

लसीकरण ऐच्छिक व मोफत

लसीकरण हे ऐच्छिक आहे. ज्यांना लस टोचून घ्यावयाची आहे, त्यांना मोफत दिली जाणार आहे. सोलापूर शहरातील सर्वोपचार रुग्णालयासह चार केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आजपर्यंत शहरातील 11 हजार 350 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील 38 हजार 678 व्यक्तींना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.

Last Updated : Jan 13, 2021, 9:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.