ETV Bharat / state

आषाढीत वारकऱ्यांसाठी बारा लाख लाडूंचा प्रसाद, मंदिर समितीकडून लाडू तयार करण्याचे काम सुरू - shahabaz shaikh

आषाढी वारीत पंढरपुरात येणारे वारकरी घरी जाताना येथील लाडू प्रसाद म्हणून घेऊन जातात. या वर्षी मंदिर समितीकडून १२ लाख लाडू तयार करण्यात येत आहे.

लाडू बनविताना महिला कर्मचारी
author img

By

Published : Jul 4, 2019, 1:16 PM IST

सोलापूर- आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना लाडूचा प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. वारीसाठी आलेले लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचा प्रसाद म्हणून लाडू घेऊन जातात. या आषाढी यात्रेत येणाऱ्या गर्दींचा अंदाज लक्षात घेता १२ लाख बुंदीचे स्वादिष्ट लाडूचा प्रसाद तयार करण्यात येणार असल्याचे सुवर्णक्रांती महिला गृह उद्योग सहकारी संस्थेच्या कविता गवळी यांनी सांगितले.

माहिती देताना सुवर्णक्रांती महिला गृह उद्योग सहकारी संस्थेच्या कविता गवळी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून सुवर्णक्रांती महिला गृहउद्योग सहकारी संस्थेला लाडू बनविण्याचे काम देण्यात आले आहे. १२ जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. ते भाविक मोठ्या श्रध्देने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू आपल्या गावी घेऊन जातात. यामुळे मंदिर समितीने मागील वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी २ लाख लाडू जादा बनवण्याचे काम सुरु केले आहे.

यासाठी एम.टी.डी.सी. येथे स्वच्छ ठिकाणी १२ लाख लाडू बनविण्याचे काम सुरु आहे. एकाच वेळी सर्व लाडू न बनवता, मागणी नुसारच लाडू बनवण्यात येणार आहे. लाडू बनवण्याचे काम ४ आचारी, ७० महिला व २० पुरुष कर्मचाऱ्यांमार्फत सुरु आहे. लाडू बनवणत असताना अन्न व औषध विभागाकडून दिलेल्या सर्व सुचनांचे पालन सुरु आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन घेणे. डोक्यावर टोपी घालणे. अंतर्गत स्वच्छता ठेवणे. आदी सुचनांचा सहभाग आहे. त्याचबरोबर लाडू बनविण्याच्या केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराने सीसीटीव्ही बसविले आहेत.

प्रसादाचा एक लाडू ७० ग्रॅमचा बनविला जातो. पिशवीमध्ये दोन लाडू दिले जातात. ही लाडूची पिशवी मंदिर समितीला साडेबारा रुपयांना दिले जाते. मंदिर समिती ही दोन लाडूची पिशवी भाविकांना १५ रुपयांना विक्री करते. लाडू प्रसादाच्या विक्रीतून देखील मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

सुवर्णाक्रांती महिला उद्योग सहकारी संस्थेच्या आशाबाई खडतरे, रुपाली गायकवाड, रुबीना सुतार आदि महिलांच्या देखरेखीखाली हे लाडू प्रसाद तयार करण्याचे काम सुरु आहे.

- लाडूसाठी वापरण्यात येणारे साहित्य

साखर - २० टन
तेल - २० टन
हरभरा - २५ टन
बेदाणा - १ टन
१ लाख रुपयांचे वेलदोडे एवढे साहित्य लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येते.

- पर्यावरणपुरक पिशवी
लाडू प्रसाद विक्री करण्यासाठी प्लास्टिक पिशवी न वापरता पर्यावरणपुरक पिशवी वापरण्यात येत आहे. ही नष्ट होऊ शकते, यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होऊ नये यासाठी ही पर्यावरण पूरक पिशवी मध्ये प्रसाद देण्यात येणार आहे.

- १२ दिवस लाडू खाण्यास योग्य
श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून चवदार व स्वादिष्ट बुंदींचा लाडू भाविक नेतात. तो बुंदीचा लाडू भाविकांनी १० ते १२ दिवसामध्ये खावा. अन्यथा तो लाडू खराब होऊ शकतो, असे कविता खडतरे यांनी सांगितले.

Intro:r_mh_sol_02_pandharpur_laddu_7201168
आषाढीत वारकऱ्यांसाठी 12 लाख लाडूचा प्रसाद,
मंदिर समितीकडून लाडू तयार करण्याचे काम सुरू

सोलापूर-
आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना प्रसाद म्हणून लाडूचा प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. वारीसाठी आलेले लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद म्हणून लाडू घेऊन जातात. या आषाढी यात्रेत येणार्यां गर्दींचा अंदाज लक्षात घेता १२ लाख बुंदीचे स्वादिष्ट लाडूचा प्रसाद तयार करण्यात येणार असल्याचे सुवर्णक्रांती महिला गृह उद्योग सहकारी संस्थेच्या कविता गवळी यांनी सांगितले. Body:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून सुवर्णक्रांती महिला गृहउद्योग सहकारी संस्थेला लाडू बनविण्याचे काम देण्यात आले आहे. दि.१२ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. ते भाविक मोठ्या श्रध्देने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू आपल्या गावी घेऊन जात असतात. यामुळे मंदिर समितीने मागील वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी २ लाख लाडू जादा बनवण्याचे काम सुरु केले आहे.

यासाठी एम.टी.डी.सी. येथे स्वच्छ ठिकाणी १२ लाख लाडू बनविण्याचे नियोजन सुरु आहे. एकाच वेळी सर्व लाडू न बनवता, मागणी नुसारच लाडू बनवण्यात येणार आहे. लाडू बनवण्याचे काम ४ आचारी, ७० महिला व २० पुरुष कर्मचायांमार्फत सुरु आहे. लाडू बनवणत असताना अन्न व औषध विभागाकडून दिलेल्या सर्व सुचनांचे पालन सुरु आहे. यामध्ये सर्व कर्मचार्यांयांची आरोग्य तपासणी करुन घेणे. डोक्याला कॅप वापरणे. अंतर्गत स्वच्छता ठेवणे. आदी सुचनांचा सहभाग आहे. त्याचबरोबर लाडू बनविण्याच्या केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराने सीसीटीव्ही बसविले आहेत.

एक लाडू ७० ग्रॅमचा लाडू बनविला जातो. पिशवीमध्ये १४० ग्रॅमचे दोन लाडू असे दिले जातात. हि लाडूची पिशवी मंदिर समितीला साडेबारा रुपयांना दिले जातात.मंदिर समिती ही दोन लाडूची पिशवी भाविकांना १५ रुपयांना विक्री करते. लाडू प्रसादाच्या विक्रीतून देखील मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

सुवर्णाक्रांती महिला उद्योग सहकारी संस्थेच्या आशाबाई खडतरे,रुपाली गायकवाड,रुबीना सुतार आदि महिलांच्या देखरखाखली हे लाडू प्रसाद तयार करण्याचे काम सुरु आहे.

लाडूसाठी वापरण्यात येणारे साहित्य -
साखर - २० टन
तेल - २० टन
हरभारा - २५ टन
बेदाणा - १ टन
१ लाख रुपयांचे वेलदोडे एवढे साहित्य लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येते.
पर्यावरणपुरक पिशवी -
लाडू प्रसाद विक्री करण्यासाठी प्लास्टिक पिशवी न वापरता पर्यावरणपुरक पिशवी वापरण्यात येत आहे. ही नष्ट होऊ शकते, यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होऊ नये यासाठी ही पर्यावरण पूरक पिशवी मध्ये प्रसाद देण्यात येणार आहे.

१२ दिवस लाडू खाण्यास योग्य
श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून चवदार व स्वादिष्ट बुंदींचा लाडू भाविक नेतात. तो बुंदीचा लाडू भाविकांनी १० ते १२ दिवसामध्ये खावा. अन्यथा तो लाडू खराब होऊ शकतो, असे कविता खडतरे यांनी सांगितले.
Conclusion:नोट- व्हीडीओ आणि बाईट हा एफटीपी वर पाठविला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.