सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. बुधवारी सोलापुरात एकूण 1322 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मात्र मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने सुरूच आहे. बुधवारी शहर आणि जिल्ह्यातील एकूण 44 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लागण झालेल्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सोलापुरात बुधवारी 1404 रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनावर मात करणारांची संख्या अधिक -
शहरात बुधवारी मनपा आरोग्य प्रशासनाने 1840 जणांची तपासणी केली होती. त्यामध्ये फक्त 78 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये 47 पुरुष आणि 31 स्त्रियांचा समावेश आहे. तर शहरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 9 पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 पुरुष आणि 5 स्त्रिया आहेत. शहरातील 128 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शहरात विविध रुग्णालयात 1317 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात लागण झालेल्यांची संख्या आणि आणि बरे होणाऱ्यांची संख्या पाहता कोरोना महामारीची लाट ओसरताना दिसत आहे. महामारीच्या लाटेची तीव्रता जरी कमी झाली असली तरी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी मात्र सुरूच आहे. सर्व व्यवहार आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचे थैमान -
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी 6954 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1244 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 727 पुरुष आणि 517 स्त्रिया आहेत. ग्रामीण भागातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 35 पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 23 पुरुष आणि 12 स्त्रिया आहेत. ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी 1276 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण भागात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने एकच थैमान घातले आहे.
वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनाचे कसोटीने प्रयत्न -
गेल्या दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या भयानक वाढली आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. पंढरपूर तालुक्यात 218 रुग्ण, माळशिरस 291, करमाळा 125, बार्शी 111, सांगोला 92, मोहोळ 89, मंगळवारी 82, अक्कलकोट 71 या तालुक्यात रुग्ण वाढले आहेत.
हेही वाचा - वादळसदृश्य परिस्थिती, मासेमारी बोटींना समुद्रकिनारी येण्याच्या सूचना