ETV Bharat / state

हरवलेल्या आईने वर्षभरानंतर पाहिले पोटच्या गोळ्याला अन् फोडला हंबरडा...

मानसिक आजाराने ग्रस्त असलेली एका महिलेने जवळपास सात-आठ महिन्यांपूर्वी आपले घर सोडले होते. टाळेबंदी लागल्याने ती रेल्वेस्थानकात राहू लागली. त्यानंतर बेघर निवारा केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार व समुदेशन केले. त्यानंतर तिच्या कुटुंबाचा शोध घेत तिला तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले.

माई-लेक
माई-लेक
author img

By

Published : Oct 6, 2020, 6:06 AM IST

सोलापूर - एका मातेने वर्षानंतर आपल्या पोटच्या गोळ्याला पाहिले आणि तिचे हृदय हेलावले. तीन वर्षांच्या लहानग्याला पाहताच तिने हंबरडा फोडला आणि धावत जाऊन त्याला मिठीत घेतले, मुके घेतले. सोलापुरातील बेघर निवारा केंद्रात सोमवारी (5 ऑक्टोबर) दुपारी या भावनिक घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्यांचे डोळे पाणावले.

हरवलेल्या आईने वर्षभरानंतर पाहिले पोटच्या गोळ्याला अन् फोडला हंबरडा

सोलापूर रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या पोस्ट ऑफीस परिसरात कविता सुरेश काळे ही टाळेबंदीपूर्वी आढळली होती. ती मनोरुग्णप्रमाणे वागत असल्याचे निदर्शनास आले. तिला सोलापूर महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. सलग सात महिने येथील वैशाली आव्हाड, प्रदीप नागटिळक यांनी कविताचे समुपदेशन करत तिच्यावर उपचार केले. बेघर निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कविताच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला उपजीवेकेसाठी काही वस्तू दिल्या. त्या वस्तू विकून ती काही पैसे जमवत होती. तिच्याशी गप्पा मारताना तिची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तिचे माहेर मुंबईजवळील अंबरनाथ असून पुणे येथील सुरेश काळेसोबत तिचे लग्न झाले आहे. तिला एक मुलगा देखील असल्याची माहिती समोर आली.

गूगल सर्च करून कविता काळेच्या पतीचे कामाचे ठिकाण व तेथील संपर्क क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सोलापुरात बोलावण्यात आले. पती, भाऊ व काका सोमवारी सोलापुरात दाखल झाले. पण, कविताला आपला तीन वर्षाचा मुलगा सिद्धेशला पहायचे होते. आपल्या पोटच्या गोळ्याला पाहताच कविताने त्याला जवळ घेतले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दृश्य पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले.

करणी झाल्याचे सांगत कुटुंबीयांनी दूर लोटले

करणी झाली आहे, ती वेडी झाली आहे, असे सांगत कविताला तिच्या सासरच्यांनी दूर लोटले होते. पण, तिच्या मन:स्थितीवर कोणतेही उपचार केले नाही. त्यामुळे खचून गेलेल्या कविताच्या मनावर आणखी परिणाम झाला होता. तिला एकटीला माहेरी पाठविले होते. मुलाचा विरह सहन न झाल्याने तिची मानसिकता आणखी बिघडली. तशाच परिस्थितीत मुलाचा शोध घेण्यासाठी तिने वर्षभरापूर्वी घर सोडले. विविध रेल्वेस्थानके ती फिरली व शेवटी सोलापुरात पोहोचली. मानसिक संतुलन ढासाळल्यामुळे ती सोलापूरच्या रेल्वेस्थानकातच राहू लागली. त्यानंतर टाळेबंदी सुरू झाल्याने रेल्वेस्थानक ओसाड पडले. त्यामुळे ती रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या पोस्ट कार्यालयाजवळ राहू लागली. दरम्यान, तिचा शोध घेण्यासाठी कविताच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तर सोलापूर रेल्वेस्थानक परिसरात एक अज्ञात महिला असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या बेघर निवारा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तिला केंद्रात आणले. त्यानंतर तिच्यावर उपचार केले. आता ती आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्या गावी, आपल्या घरी, आपल्या कुटुंबियांसह राहणार आहे.

हेही वाचा - सततच्या अपमानाने चिडून लहान भावाने मोठ्या भावाचा काढला काटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.