सोलापूर - हिंदू संस्कृतीत कावळ्याला महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा पिंडदान असते तेव्हाच या कावळ्यांची प्रेमाने वाट सर्व जण पाहतात. पण, इतरवेळी त्यांना कणकण भर अन्नासाठी भटकंती करावी लागत असते. ही जाणीव मनी ठेऊन माढ्यातील अर्जुन अनिल भांगे हे हॉटेल व्यावसायीक दररोज कावळ्याची भुक भागवत आहेत.
त्यांच्या या कामामुळे त्यांना शहरासह पंचक्रोशित लोक 'कावळे मामा' या नावाने संबोधतात. ते दररोज नव्वद ते शंभर कावळ्यांना एक किलो फरसाणा त्या सोबतच चिवडा, शेंगदाण्याचे अन्नदान करुनच आपल्या व्यवसायाची सुरूवात करतात. गेल्या वर्ष भरापासून ते कावळ्यांचे जणू दोस्तच बनले आहेत.
हेही वाचा - यावले-सालसे राज्य मार्गाच्या कामाला माढ्यात ब्रेक, पुनर्वसन करण्याची टपरीधारकांची मागणी
काही कारणामुळे भांगे यांचे नाष्टा सेंटर बंद राहिले तर भांगे कावळ्यांना भोजन देऊनच त्या नियोजित कामाला जातात. मनसोक्त भोजन मिळत असल्याने कावळाच्या संख्येत वाढ होत आहे. तिसऱ्याच्या विधीला कावळ्याची वाट पाहत बसावे लागते, अशा स्थितीत भांगे यांच्याकडे शेकडो कावळ्यांचा थवा दररोजच जमतो. त्यांच्या या मनाच्या श्रीमंतीची चर्चा शहरासह पंचक्रोशीत होतेच आणि दररोज सकाळी ते माढेकरांना पाहायलाही मिळते.
हेही वाचा - लोकमंगल साहित्य पुरस्काराचे 'हे' आहेत यंदाचे मानकरी