सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले गुरूजी हे झळकले ते अमेरिकन फुलब्राइट संस्थेने त्यांना शिष्यवृत्यी जाहीर केली तेव्हा. डिसले गुरूजी यांनी क्यूआर कोड प्रणाली विकसित केली आहे. त्यानंतर त्यांना पुरस्कार मिळाला. या काळात डिसले गुरूजींचे राज्यभरात भांबावल्याप्रमाणे कौतूक झाले. ( Take Action Against Disley ) मात्र, त्यांच्या शाळेतील कार्यकाळाबद्दल कायम वादंग राहीले आहे. हेच वादंग आता उफाळून आले असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डीसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे. जवळपास 34 महिने कामावर हजर न राहता डिसले यांनी पगार घेतला अशी तक्रार जिल्हा प्रशासनाची आहे.
सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार - येत्या (8 ऑगस्ट)रोजी त्यांना कार्यमुक्त केले जाणार असले तरी जिल्हा प्रशासन डीसले गुरुजींवर कारवाई करणार आहे. ( Administration Will Take Action Against Disley Guruj ) जवळपास 34 महिने कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतला आहे असी तक्रार जिल्हा प्रशासनाची आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या काळातील सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे, अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे.
चौकशी अहवाल जिल्हापरिषद सीईओंकडे सादर - सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांनी (2017 ते 2020)या कालावधीत काय केले? याबाबत सखोल चौकशी झाली आहे. याबाबत एक फाईल तयार करण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल जिल्हापरिषद सीईओंकडे गोपनियरित्या सादर करण्यात आला आहे.
रजेच अर्ज गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्या - डिसले यांना पीएचडी करण्यासाठी अमेरिकेतील फुल ब्राईट संस्थेने शिष्यवृत्ती मंजूर केली होती. त्यानुसार ऑगस्टमध्ये ते अमेरिकेला जाणार होते. त्यासाठी परवानगी मागण्यासाठी जानेवारी महिन्यात ते जिल्हा परिषदेत आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना भेटण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी शिक्षणाधिकारी लोहार यांनी रजा मंजुरीची नियमावली सांगितली होती. रजेचा अर्ज गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे द्या. तेथून तो माझ्याकडे येईल, असही त्यांनी सांगितले होते.
पीएचडी कोणत्या विद्यापीठात करणार आहेत? - या दरम्यान, वरिल नियम टाळून थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांकडे जाणे किंवा माझ्याकडे न येणे हे नियमात बसत नाही, असे कारण समोर केले आहे. तसेच, पीएचडी कोणत्या विद्यापीठात करणार आहेत? पीएचडी करण्यासाठी अमेरिकीन वीद्यापीठाने दिलेली परवानगी सर्व माहिती सादर करा, मग रजेचा अर्ज मंजूर केला जाईल असही डिसलो यांना सांगितले होते. गट शिक्षणाधिकाऱ्याकडे रजेसाठी सर्व कागदपत्रासह अर्ज करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र, हे केले नाही अशी तक्रार वरिल लोकांची आहे.
शिक्षण मंत्र्यांनी दखल घेत रजा मंजूर केली होती - शिक्षण विभागाने रणजितसिंह डीसले यांना रजा नाकारल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच राज्यभर खळबळ उडाली होती. तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजींना तत्काळ रजा मंजूर करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले होते. त्या काळात माध्यमांसमोर येऊन डीसले यांनी वरिष्ठांवर गंभीर आरोपही केले होते. याची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
शिक्षण विभागाने चौकशी करून अहवाल तयार केला - रजेच्या प्रकरणानंतर डिसले गुरुजींनी मिळवलेली पदवी व त्यानंतर तीन वर्षे जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे प्रतिनियुक्तीवर असताना केलेल्या कामाबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. तत्कालीन शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी यापूर्वीच चौकशी करून अहवाल तयार केला होता. त्याबद्दल सर्व चौकशी करून विद्यमान शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी अहवाल तयार केला आणि जिल्हा परिषद सीईओ यांकडे सादर केला. कारवाई होण्याअगोदर राजीनामा नोटीस दिल्याने कारवाई थांबणार नाही, त्यांना दिलेली शासन सर्व पगार वसूल करणार आहोत अस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा अहवाल सादर करा; 'NIA'ला न्यायालयाचे निर्देश