ETV Bharat / state

व्हिडिओ : सोलापुरात तेलंगणा परिवहन मंडळाची बस जळून खाक - Truck

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास हैदराबादवरुन पंढरपूरला जाणाऱ्या तेलंगणा परिवहन मंडळाच्या बसचा अपघात झाला. यात ही बस जळून खाक झाली.

तेलगंणा लंगणा परिवहन मंडळाची बस
author img

By

Published : Jun 7, 2019, 9:28 AM IST

Updated : Jun 7, 2019, 10:46 AM IST

सोलापूर - हैदराबादवरुन पंढरपूरला जाणाऱ्या तेलंगणा परिवहन मंडळाच्या बसचा सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यामुळे बसला आग झाली. या अपघातात बसमधील चालक-वाहकाचे पाय तुटले असून १८ प्रवाशांपैकी ११ प्रवासी जखमी झाले आहेत.

बसबाबत माहिती देताना सोलापूरचे जिल्हा आगार नियंत्रक

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर ही बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. समोरच्या ट्रकमध्ये बॅटऱ्या भरल्या असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली आणि त्यात बस जळून खाक झाली. बस जळून खाक झाल्यामुळे त्याचा नंबर कळत नाही. मात्र, ०८७ ०१९९ असा या गाडीचा नंबर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेनंतर अग्निशमन दलाच्या ३ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. अपघातातील जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यातल्या ११ जणांपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सोलापूरचे आगार नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबाद वरून पंढरपूरला जात होती. यात १८ प्रवासी होते. यातील ११ प्रवासी जखमी आहेत.

sample description
Last Updated : Jun 7, 2019, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.