सोलापूर/पंढरपूर - तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मंगळवारी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. केसीआर यांच्यासमवेत तेलंगाणाचे अख्खे मंत्रिमंडळ सोमवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. केसीआर यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
-
Watch Live: Leaders from various parties in Maharashtra joining the BRS Party in the presence of Party President, CM Sri KCR, at Solapur. https://t.co/DjJRZpS8cn
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Watch Live: Leaders from various parties in Maharashtra joining the BRS Party in the presence of Party President, CM Sri KCR, at Solapur. https://t.co/DjJRZpS8cn
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023Watch Live: Leaders from various parties in Maharashtra joining the BRS Party in the presence of Party President, CM Sri KCR, at Solapur. https://t.co/DjJRZpS8cn
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023
भगीरथ भालकेंचा बीआरएसमध्ये प्रवेश - विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर भालके यांनी मंगळवारी (27 जून) तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भालके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. भगीरथ भालके यांच्यासह पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते बीआरएसमध्ये दाखल झाला आहेत.
स्वाभिमान जपण्यासाठी राष्ट्रवादी सोडली : भगीरथ भालके यांनी मंगळवेढा येथे 24 जून रोजी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करत बीआरएस प्रवेशाबाबत चर्चा केली होती. स्वाभिमान जपण्यासाठी राष्ट्रवादी सोडत असल्याचे भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. तसेच यावेळी भालके यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोपही केले होते.
राष्ट्रवादीमध्ये दुफळी - मागील महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावली होती. तेव्हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यादरम्यान पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवार देण्याचे संकेत शरद पवार यांच्याकडून देण्यात आले होते. तेव्हापासून पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण झाली होती.
-
పండరిపూర్ లో శ్రీ విట్ఠల్ రుక్మిణీ దేవీ ఆలయంలో ప్రత్యేక పూజల్లో పాల్గొన్న ముఖ్యమంత్రి శ్రీ కేసీఆర్.
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
CM Sri KCR offered special pooja at Shri Vitthal Rukmini Devi Temple in Pandharpur, Maharashtra. pic.twitter.com/5xBgyWcX5F
">పండరిపూర్ లో శ్రీ విట్ఠల్ రుక్మిణీ దేవీ ఆలయంలో ప్రత్యేక పూజల్లో పాల్గొన్న ముఖ్యమంత్రి శ్రీ కేసీఆర్.
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023
CM Sri KCR offered special pooja at Shri Vitthal Rukmini Devi Temple in Pandharpur, Maharashtra. pic.twitter.com/5xBgyWcX5Fపండరిపూర్ లో శ్రీ విట్ఠల్ రుక్మిణీ దేవీ ఆలయంలో ప్రత్యేక పూజల్లో పాల్గొన్న ముఖ్యమంత్రి శ్రీ కేసీఆర్.
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023
CM Sri KCR offered special pooja at Shri Vitthal Rukmini Devi Temple in Pandharpur, Maharashtra. pic.twitter.com/5xBgyWcX5F
केसीआर यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन - तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे सोमवारी रात्री सोलापुरात दाखल झाले होते. तिथे त्यांचे बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर मंगळवारी सकाळी केसीआर हे आपल्या मंत्रिमंडळासमवेत सोलापुरातून पंढरपूरसाठी रवाना झाले होते. दुपारी केसीआर यांनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.
हेही वाचा -