ETV Bharat / state

Teacher Drown in Well : नवीन कार घेतलेल्या शिक्षकाचा कारसह विहिरीत बुडून मृत्यू, एका चुकीनं झाला अपघात - सोलापूर शिक्षक कार अपघात

Teacher Drown in Well नवीन कार घेतल्यानंतर ट्रायल घेताना शिक्षकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ब्रेक दाबण्याऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्यानं हा रविवारी अपघात झाला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झालीय.

Teacher Drown in Well
Teacher Drown in Well
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 8:16 PM IST

सोलापूर Teacher Drown in Well : नवीन घेतलेली चारचाकी दाखवण्यासाठी मेहुण्याच्या घरी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाचा कारसह विहीरीत बुडून मृत्यू झाला आहे. कार चालवायला जमत नव्हती. तरीदेखील त्यांनी छोटासा ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातच अपघात झाल्यानं शिक्षकाचा मृत्यू झाला. इरण्णा बसप्पा जुजगार (वय ४१ रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) असे मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पाच दिवसांपूर्वी नवीन कार घेतली होती- इरण्णा जुजगार यांनी पाच दिवसांपूर्वी एमएच १३ - इसी - ६०६८ या क्रमाकांची चारचाकी घेतली होती. रविवारी सुटी असल्याने ते आपल्या कुटुंबीयांसमवेत ते भाटेवाडी डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे सासरी गेले होते. ड्रायव्हरसह सर्वजण खाली उतरले होते. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी उन्हात उभी असलेली मोटार सावलीत लावण्याचा प्रयत्न केला. चारचाकीच्या स्टेअरिंगवरील त्यांचा ताबा सुटला. अचानक कारवरील नियंत्रण सुटलं. ब्रेक दाबण्याऐवजी एक्सिलेटरवर पाय पडला. कार स्टार्ट करताच स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि नवीन कार थेट विहिरीत कोसळली. या अपघातात ४१ वर्षीय शिक्षकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना भाटेवाडी डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील अमले वस्तीवर रविवारी दुपारच्या सुमारास घडली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांचे मेहुणे चंद्रशेखर अमले यांनी इरण्णा जुजगार यांना विहिरीतून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

नवीन कारचे पेढे वाटण्यासाठी सासरी गेले होते-मयत इरण्णा जुजगार हे मूळ मैंदर्गीचे राहणारे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील वडगाव (ता. द. सोलापूर) येथील जि.परिषद शाळेत शिक्षक म्हणून कामास होते. तसेच दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात शिक्षक आणि नातेवाईकांची गर्दी झाली होती. नवीन कार घेतल्याचा शिक्षक जुजगार मोठा आनंद यांना झाला होता. नवीन कार घेतल्यानं रविवारी सकाळी ते सासरी पेढे वाटण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील भाटेवाडी येथे गेले होते. यावेळी अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा-

  1. Nashik Chandwad Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ कार-कंटेनरचा भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू
  2. Telangana Tourist Car Accident : चिखलदरा फिरायला आलेल्या तेलंगाणातील पर्यटकांच्या कारचा अपघात; चार बँक अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.