ETV Bharat / state

श्रीक्षेत्र अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ धावले पूरबाधितांच्या मदतीला

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने यापूर्वी देखील दुष्काळ, भूकंप, व अतिवृष्टीच्या काळात राज्यासह परराज्यातही मदत केली आहे. त्याचप्रमाणे याही वेळेस पूरग्रस्त जिल्ह्यांना मंडळाकडून खाद्यपदार्थमध्ये चिवडा आणि पिण्याच्या पाण्याच्या ११ हजार बाटल्या देण्यात आल्या.

श्रीक्षेत्र अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ धावले पुरग्रस्तांच्या मदतीला
author img

By

Published : Aug 12, 2019, 4:36 AM IST

सोलापूर - श्रीक्षेत्र अक्कलकोटचे श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांसाठी मदत पाठविण्यात आली आहे. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली, मंडळाकडून एक लाख पाकिटे खाद्यपदार्थ व इतर साहित्य पाठविण्यात आले आहे.

माहिती देताना न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने यापूर्वी देखील दुष्काळ, भूकंप, व अतिवृष्टीच्या काळात राज्यासह परराज्यातही मदत केली आहे. त्याचप्रमाणे याही वेळेस पूरग्रस्त जिल्ह्यांना मंडळाकडून खाद्यपदार्थमध्ये 361 बॉक्स बिस्कीट पुडे, 10 हजार पोती चिवडा, 33 बॉक्स स्नॅक्स पुडे, 33 बॉक्स उपवासाचा फराळी चिवडा आणि पिण्याच्या पाण्याच्या ११ हजार बाटल्या देण्यात आल्या. हे सर्व सामान 5 ट्रकांमध्ये भरुन रविवारी सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले.

यामध्ये हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेकडून पूरबाधितांसाठी सॅनेटरी नॅपकीन, व्हिक्स डब्या, ग्रामपंचायत सांगावी (बु) व ग्रामस्थांकडून बिस्कीटांची पाकिटे, पाणी बॉटल, फरसानसह इतर आवश्यक साहित्य पाठविण्यात आले. अक्कलकोट नजीक असलेल्या समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीतील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाकडून चार पोते तांदूळ पाठवण्यात आले. तसेच न्यासाच्या सुरक्षा विभागातील राजू पवार यांच्याकडून पाणी बॉटल, बालाजी कपडा भंडार रणसुभे यांच्याकडून मुलांचे-मुलींचे यासह पुरुष-महिलांचे २ हजार ५०० कपड्यांसह बिस्कीटांचे बॉक्स देण्यात आले.

यावेळी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले उपस्थित होते. त्यांच्या उपस्थित धुळे येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व औरंगाबादचे वरिष्ठ न्यायाधीश आशिष आयचित यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाहनांना सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले.

Intro:सोलापूर : श्रीक्षेत्र अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीला धावून गेलं आहे.न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून एक लाख पाकीट खाद्यपदार्थ पाठवले आहेत.Body:स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने यापूर्वी दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी काळात राज्यासह परराज्यातही आपत्तीच्या वेळी मदतीला धावून गेले आहेत.त्याचप्रमाणे याहीवेळेस
खाद्यपदार्थमध्ये 361 बॉक्स बिस्कीट पुडे, 10 हजार पोती चिवडा, 33 बॉक्स स्नँक्स पुडे,33 बॉक्स उपवासाचे फराळी चिवडा पोते आणि पिण्याच्या पाण्याच्या ११ हजार बाटल्या बॉक्स यांसह आज 5 ट्रक सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना झाले.यामध्ये हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेकडून सॅनेटरी नॅपकीन ६०० नग (५ बॉक्स), व्हिक्स गोळ्या १ हजार, ५ जार, छोट्या व्हिक्स डब्या ३०० नग व मोठ्या ३०० नग, मोठे डब्बे ८० नग, व्हिक्स इनवेलर ४० नग, व ग्राम पंचायत सांगावी (बु) व ग्रामस्थ यांच्याकडून पारले बिस्कीट २६७४ नग (१९ बॉक्स), पाणी बॉटल २७६ नग (२३ बॉक्स), फरसान ४ किलो, कुरकुरे २०० पुडे (२ बॉक्स), अक्कलकोट नजीक असलेल्या समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीतील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांच्या कडून चार पोते तांदूळ, न्यासाच्या सुरक्षा विभागातील राजू पवार ५ बॉक्स पाणी बॉटल, बालाजी क्लार्थ स्टोर्स रणसुभे यांच्याकडून लहान- मोठे, मुलांचे व मुलींचे यासह पुरुष महिलांचे २ हजार ५०० कपडे यासह बिस्कीटचे २ बॉक्स देण्यात आले.
बावकरवाडी ग्रामस्थाकडून १ पोते ज्वारी, २ पोते गहू, १ पोते तांदूळ, १ किलो दाल, मिठ ८ पाकीट, बिस्केत ८ पाकीट, साड्या १२ नग यासह न्यासाच्या प्रांगणातील उपहारगृह राठोड यांच्याकडून ५ बॉक्स पाण्याचे बॉटल्स, शांतप्पा कलबुर्गी यांच्याकडून ३ बॉक्स कुरकुरे देण्यात आले.Conclusion:यावेळी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व औरंगाबादचे वरिष्ठ न्यायाधीश आशिष आयचित यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करून ट्रक्स सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.