पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज राष्ट्रवादी कार्यकर्ते मेळावा घेतला. त्यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अजित पवार यांना वीजबिल सक्तीने वसुली बंद करावी, यासह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. मात्र मेळाव्यात सोडण्याची कारणावरून पोलीस व स्वाभिमानी पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्याला राष्ट्रवादी कार्यकर्तेकडून कोरोना नियमांचा पूर्ण फज्जा उढल्याचे दिसून आले.
स्वाभिमानीची महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागणी
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ स्वाभिमानी संघटनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून दिवंगत आमदार भारत नाना भालके हे स्वाभिमानीच्या तिकीटावर 2009साली निवडून गेले होते. तसेच 2014साली आ. प्रशांत परिचारक यांना स्वाभिमानीकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पंढरपूर मतदारसंघ हा स्वाभिमानी हक्काचा आहे. त्यामुळे सध्याच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून ही जागा स्वाभिमानीला द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी सक्तीच्या वीजबिलाविरोधात निवेदन
सोलापूर जिल्ह्यामधील वीजबिलाचा मुद्दा हा कळीचा बनला आहे. यामुळे शेतकरी संघटना 19 मार्च रोजी जिल्हा आंदोलन केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुमतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वीजबिलाबाबत निवेदन देण्यात आले. यामध्ये सक्तीची वीजवसुली रद्द करावी, शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशा विविध मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला