ETV Bharat / state

खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला दोनशे रुपयांचा दंड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या शनिवारी सोलापूर दौ-यावर आल्या होत्या. यावेळी वाहतूक पोलिसांनी सुळे यांच्या गाडीवर कारवाई केली आहे.

सुप्रिया सुळे
author img

By

Published : Aug 25, 2019, 12:32 AM IST

सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सुळे यांच्या गाडीवर 200 रुपयांचा दंड लावला आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.

सुप्रिया सुळे या शनिवारी सोलापुरच्या दौ-यावर आल्या होत्या. त्यांचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात डॉक्टर, अभियंता, वकील, उद्योजकांशी सुसंवादाचा कार्यक्रम होता. सायंकाळी 7 वाजता कार्यक्रमाला सुरूवात झाली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत शहर जिल्ह्यातील पदाधिकारी व नेत्यांच्या गाड्यांचा ताफा डफरीन चौकात आला. या सर्व गाड्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहाबाहेर नो पार्किंगमध्ये लावण्यात आल्या होत्या. सभागृहात कार्यक्रम सुरू असताना गाड्यांमुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी या नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या गाड्यांवर कारवाई केली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांना ही गोष्ट लक्षात येताच ते चौकात असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांसमवेत सभागृहासमोर आले. त्यांनी गाड्यांचा फोटो काढून प्रत्येकी दोनशे रूपयाचा ई-चलनाद्वारे दंड करण्यास सुरूवात केली. सुप्रिया सुळे कार क्र.एम.एच-12 आर.पी-3837 मधून आल्या होत्या. त्यांच्या गाडीवरही दोनशे रूपयाचा ई-चलनाद्वारे दंड आकारण्यात आला आहे.

Intro:सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर सोलापूर शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केलीय.ही कारवाई आज शनिवारी सायंकाळी करण्यात आली. Body:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खा.सुप्रिया सुळे या शनिवारी सोलापुरच्या दौ-यावर आल्या होत्या.त्यांचा इंडियन मेडीकल असोसिएशनच्या सभागृहात डॉक्टर,अभियंता, वकिल,उद्योजकांशी सुसंवादाचा कार्यक्रम होता. सायंकाळी 7 वाजता कार्यक्रमाला सुरूवात झाली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत शहर जिल्ह्यातील पदाधिकारी व नेत्यांच्या गाड्यांचा ताफा डफरीन चौकात आला.या सर्व गाड्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहाबाहेर रस्त्यावर लावण्यात आल्या.सभागृहात कार्यक्रम सुरू असताना बाहेर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या गाड्यांमुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.Conclusion:हा सर्व प्रकार सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांच्या लक्षात आला. चौकात असलेले वाहतूक शाखेच्या पोलिसांसमवेत सहायक पोलीस निरीक्षक भोसले सभागृहासमोर आले.त्यांनी गाड्यांचा फोटो काढुन प्रत्येकी दोनशे रूपयाचा ई-चलनाद्वारे दंड करण्यास सुरूवात केली.खा.सुप्रिया सुळे याही ज्या कार क्र.एम.एच-12 आर.पी-3837 मधुन आल्या होत्या.त्या कारवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली अन दोनशे रुपयांचा दंड आकारला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.