पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना परस्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या मुत्यूचा दर जास्त आहे. त्यात पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, बार्शी, माढा तालुक्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. या तालुक्यात लसीकरण मोहीम राबवणे गरजेचे आहे. पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीनंतर कोरोनाची लाट निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्याला दोन लाख लसीची गरज असताना केवळ १८ हजार लस दिल्या जात आहे. त्यामुळे प्रत्येक तालुका व गावाला मागणीपेक्षा लस कमी येत आहे. सोलापूर जिल्ह्याला जास्तीत जास्त लस द्यावी, अशी मागणी भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात कोरोनाची लाट..
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीनंतर कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. पोटनिवडणुकीमध्ये नेत्यांच्या सभेत गर्दी झाल्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. चार दिवसापासून मतदारसंघांमध्ये एक हजार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पोटनिवडणुकीत कोरोना नियमांचे उल्लंघन करत हजारोंच्या सभा घेण्यात आल्या. मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यात मृत्यूचा दरही वाढणार आहे. पोटनिवडणुक प्रचारात सहभागी झालेल्या नेत्यांना कोरोना लागण झाली. मतदार संघामध्ये कोरोनाची लाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात जास्त लसीकरणाची गरज..
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात गेल्या चार दिवसापासून एक हजाराच्या आसपास नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक ती पार पडली त्यातच लोकांचे एकमेकांशी संपर्क मोठ्या प्रमाणावर आला आहे. त्यामुळे मतदारसंघात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून मिळणारी लस तुटपुंज्या असल्याचा आरोप आ. प्रशांत परिचारक यांनी केला आहे.
लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी..
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मतदारसंघातील नागरिक लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना माघारी परतावे लागत आहे. तरी मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात लसीकरण केंद्र वाढवावी व जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार परिचारक यांनी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे गेले आहे.