ETV Bharat / state

तिवरेधरण खेकड्यांनी फोडलं का? आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर

एका विद्यार्थ्याने 'आदित्य संवाद'मध्ये थेट आदित्य यांच्याकडून पुन्हा एकदा तिवरे धरणाच्या विषयावर उत्तराची अपेक्षा केली. विशेष म्हणजे यावेळी खुद्द तानाजी सावंत कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी विषयांतर करून आदित्य यांनी  वेळ मारून नेली.

'आदित्य संवादा'ला खेकड्याचा डंख आणि आदित्यची सावरा सावर
author img

By

Published : Jul 31, 2019, 7:21 PM IST

Updated : Jul 31, 2019, 8:24 PM IST

सोलापूर - रत्नागिरीच्या तिवरे धरण फुटीनंतर शिवसेना नेते व पुनर्वसन मंत्री तानाजी सावंत यांच्या 'खेकड्यांमुळे धरण फुटले' या वक्तव्यामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली होती. त्यानंतर शिवसेनेला समाज माध्यमांवर ट्रोलही करण्यात आले. हा विषय आता संपलाय असे वाटत असतानाच एका विद्यार्थ्यांने 'आदित्य संवाद'मध्ये थेट आदित्य यांच्याकडून पुन्हा एकदा या विषयावर उत्तराची अपेक्षा केली. विशेष म्हणजे यावेळी खुद्द तानाजी सावंत कार्यक्रमात उपस्थित होते.

तिवरेधरण खेकड्यांनी फोडलं का? आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर

विद्यार्थ्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी आधी 'तुम्ही हा प्रश्न इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना विचारयला हवा' असा सल्ला दिला. पुढे ते म्हणाले, धरण अनेकदा घर्षणामुळे फुटते, दगडावर पाण्याची लाट आदळल्याने फुटते तसेच एखाद्या ठिकाणी जास्त हालचाल झाल्यानेही ते फुटू शकते. खेकड्यांनी जास्त हालचाल केल्यामुळे धरण फुटले असावे असे गावकऱ्यांना वाटले होते, असा खुलासा करत आदित्य यांनी सारवासारव केली.
आदित्य म्हणाले, 'धरण कुणामुळे फुटले याचा विचार करण्यापेक्षा आत्ता राज्यात जी धरणे आहेत त्यांचे मजबुतीकरण करणे आणि ते सुरक्षित आहेत का ते तपासणे गरजेचे आहे' अशाप्रकारे विषयांतर करून आदित्य यांनी वेळ मारून नेली.

दरम्यान, एका विद्यार्थ्याने हा प्रश्न उपस्थित करुन आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला खेकड्याचा डंक मारला अशी चर्चा उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये सुरू झाली होती.

Intro:सोलापूर : रत्नागिरीच्या तिवरे धरण फुटीनंतर शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी खेकड्यांच्या संदर्भ देत केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना अडचणीत आली होती.खेकड्यांमुळं धरण फुटलं या पुनर्वसन मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना समाज माध्यमांत ट्रोल झाली होती. हा विषय आता संपलाय असं वाटत असतानाच आज एका विद्यार्थ्यांनं आदित्य संवाद मध्ये थेट आदित्य यांच्याकडून खऱ्या उत्तराची अपेक्षा केली.

Body: विद्यार्थ्याच्या त्या प्रश्नावर सर्वजण अवाक झाले.विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेनेचे सोलापूरचे संपर्कप्रमुख तथा मंत्री खुद्द तानाजी सावंत यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी त्या विद्यार्थ्याला त्याची फॅकल्टी विचारली आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याने आपण कॉमर्सचे विद्यार्थी असल्याचे सांगितले असता, तुम्ही हा प्रश्न इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना ही विचारयला हवा असे सांगून आधी त्यांनी धरण अनेकदा घर्षणामुळे फुटते,दगडावर पाण्याची लाट आदळल्यामुळे फुटते तसेच कुठेही जास्त ॲक्टिविटी झाली तरीही ते लुटू शकते.मग खेकड्याने ऍक्टिव्हिटी केल्यामुळे हे घडले असावे असेच गावकऱ्यांना वाटलं होतं असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी यानिमित्ताने केला आहे.पण फक्त धरणांच्या ठिकाणी अशा प्रकारची अडचण झाली आहे का यावर संशोधन सुरू आहे.पण धरण कोणामुळे फुटलं यापेक्षा आत्ता राज्यात जी धरणे आहेत त्यांचे मजबुतीकरण कसे करू हे पाहणे हे पाहिले पाहिजे तसेच ती सुरक्षित आहेत का तेही तपासले पाहिजे. एक तर धरणे कमी पडत आहेत ती वाढवली पाहिजेत असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला आणि ती वेळ मारून नेली.पण एका विद्यार्थ्यांने हा प्रश्न उपस्थित करुन आदित्य ठाकरे यांच्या या कार्यक्रमाला खेकड्याचा डंक मारला अशी चर्चा उपस्थित विद्यार्थ्यांत सुरु झाली.

Conclusion:एकूणच एखाद्या दुर्घटनेनंतर नेत्यांनी सार्वजनिक जीवनात जबाबदारीचं भान ठेवूनच वक्तव्य करायला हवीत.कारण भान सोडून केलेली वक्तव्य ही समाजमनात कायम राहतात अन मग मोक्याच्यावेळी डंख मारतात हे या घटनेवरून स्पष्ट झालंय..
Last Updated : Jul 31, 2019, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.