ETV Bharat / state

क्रुरकर्मा.. पोटच्या मुलाकडून गॅस सिलिंडर डोक्यात घालून आईची हत्या, जाळण्याचाही प्रयत्न - मुलाकडून आईची हत्या

दारूच्या नशेत मुलाने आईच्या डोक्यात गॅस सिलिंडर टाकी घालून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सोलापुरातील संजय गांधी नगरात दोन नंबर झोपडपट्टीत घडली. घरगुती कारणातून ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

son-killed-his-mother
son-killed-his-mother
author img

By

Published : May 4, 2021, 12:58 AM IST

Updated : May 4, 2021, 4:13 PM IST

सोलापूर - दारूच्या नशेत मुलाने आईच्या डोक्यात गॅस सिलिंडर टाकी घालून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना येथील संजय गांधी नगरात दोन नंबर झोपडपट्टीत घडली. घरगुती कारणातून ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. शरणव्वा दत्ताप्पा गोळसर (वय ६५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सिद्धाराम दत्तप्पा गोळसर (वय ३२) या मुलाला ताब्यात घेतले आहे.

सोलापुरात पोटच्या मुलाकडून आईची हत्या

पैशासाठी दारूड्या मुलाने आईस केले ठार -

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या तीन ते चार दिवसापासून संशयित आरोपी सिद्धाराम गोळसर हा आपल्या आईशी दारू पिऊन वाद घालत होता. गेल्या तीन दिवसापासून सारखे भांडण सुरू होते. सोमवारी दुपारी सिद्धाराम याने आईच्या डोक्यात सिलिंडर टाकी घातली. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास परिसरात पसरली. घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आरोपी हा घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांनी त्याची विचारपूस केली. यावेळी नशेमध्ये तो पोलिसांनाही उलट सुलट उत्तरे देत होता. "तुम्ही कोणीही माझ्या आईच्या मृतदेहाला हात लावू नका, इथून तिला घेऊन जाऊ नका असे म्हणत आरडा ओरडा करत होता. अंत्यसंस्कार आम्ही सर्व बांधव मिळून करू, असे तो म्हणत होता.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती -

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. घटना कळताच पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, डॉ. प्रीती टिपरे, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पवार, गुन्हे शाखेचे प्रभारी सुनील दोरगे यांनी घटनास्थळी पाहणी केली. सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

Last Updated : May 4, 2021, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.