ETV Bharat / state

सोलापूर युवक काँग्रेसच्यावतीने बाईक स्पर्धा; भाजपाचा नोंदवला निषेध

सोलापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहर युवक काँग्रेसच्यावतीने मनपातील सत्ताधारी भाजपाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

solapur yuvak congress agitation over bjp
सोलापूर युवक काँग्रेसच्यावतीने बाईक स्पर्धा; भाजपाचा नोंदवला निषेध
author img

By

Published : Oct 16, 2020, 9:04 PM IST

सोलापूर - महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात सर्वत्र खड्डे पडले आहेत आणि भोंगळ कारभार चालू आहे, असा आरोप शहर काँग्रेसने केला. तसेच शहर काँग्रेसच्यावतीने त्याचा निषेध म्हणून मोटार रेस स्पर्धेचे आयोजन केले.

सोलापूर युवक काँग्रेसच्यावतीने बाईक स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करत भाजपाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले, सोलापूर महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कुठलेही योग्य नियोजन न करता सोलापुर शहरात आणि इतर अनेक ठिकाणी रस्ते तसेच ड्रेनेज, इतर कामे अतिशय संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी खड्डे खणले आहेत. तसेच शहरात रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहेत, हेच समजत नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यातच पावसामुळे सर्वत्र चिखल, दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. नागरिक खड्यात पडत आहेत. अपघात होत आहेत. अंगदुखीचे व इतर आजार शहरातील नागरिकांना होत आहेत. धुळीचाही प्रचंड त्रास होत असल्यामुळे नागरिकांना विविध आजार होत आहेत. शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत. स्मार्ट सिटीचे कामे, निकृष्ट आणि अतिशय संथगतीने सुरू आहे. हे सोलापूर आहे की खड्डेपुर हेच समजेना झाले, असा आरोप त्यांनी केला.

या सर्व बाबींचा निषेध शुक्रवारी MUD BIKE RACE (मोटार रेस) स्पर्धा आयोजित करण्यात आली. शहरातील रस्ते या प्रकारचे आहेत, हे दाखवून सोलापूर मनपातील सत्ताधारी भाजपाच्या कारभाराचा निषेध केला.

दरम्यान, प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले म्हणाले, सत्ताधारी भाजपवाल्यांनी शहराची अवस्था अतिशय वाईट करुन ठेवली आहे. कुंभकर्णी झोप घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी, रस्त्यांची अवस्था प्रत्यक्ष दाखविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास मनपाच्या सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांना शहरात फिरू देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात दक्षिण विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना, महापालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, संजय गायकवाड यांच्यासह नवी पेठ भागातील नागरिक, व्यापारी सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.