ETV Bharat / state

कौतूकास्पद..! शहरातील मुक्या, जनावरांसाठी धावली तरुणाई - शहरातील मुक्या, जनावरांसाठी तरूण करतायेत चारा पाण्याची सोय

माणसांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी अनेकांनी घेतली. मात्र, मुक्या जनावरांचा कोणीही वाली नाही. अशा मुक्या जीवासाठी सोलापूरातील काही तरुणांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ते तरुण शहरातील मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याची सोय करत आहेत.

solapur young boys provides Fodder and water for stray animals
कौतूकास्पद..! शहरातील मुक्या, जनावरांसाठी धावली तरुणाई
author img

By

Published : May 17, 2020, 11:55 AM IST

Updated : May 17, 2020, 12:15 PM IST

सोलापूर - कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या शहरातील मजुरांसह मुक्‍या जनावरांचे आतोनात हाल होत आहेत. माणसांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी अनेकांनी घेतली. मात्र मुक्या गुरांचा कोणीही वाली नाही. अशा मुक्या जीवासाठी सोलापूरातील काही तरुणांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ते तरुण शहरातील मुक्या जनावरांच्या चारा पाण्याची सोय करत आहेत.

solapur young boys provides Fodder and water for stray animals
मुक्या जनावरांची भूक भागवताना तरुण...

सद्या लॉकडाऊनमुळे शहरात चारा मिळणे कठीण बनले आहे. अशात भटके जनावरे कॅरीबॅग खाताना तरुणांच्या नजरेस दिसून आले. तेव्हा त्यांनी जनावराची होणारी परवड ओळखून त्या जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय केली. शहरातील रुपाभवानी मंदीर, कुंभार वेस, बाळीवेस, निला नगर, सम्राट चौक, आंबेडकर उद्यान, कडबा गल्ली, हनुमान नगर, उदय मुखी चौक या परिसरातील भटक्या जनावरांना चारा पाणी करण्याचे काम सोलापुरातील तरुणाई करत आहे.

भटक्या जनावरांना चारा टाकताना तरुण...

या जनावरांना रोज सकाळी हिरवा चारा दिला जातो. हा उपक्रम तरुणांनी मागील महिनाभरापासून अविरत सुरू ठेवला आहे. या उपक्रमासाठी अभिजीत कांबळे, अतुल सोनवणे, अजित गादेकर, बंटी गायकवाड, अवधुत शेवाळे, नाना हे श्रम घेत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतूक प्राणीप्रेमींमधून होत आहे.

मुक्या जनावरांना हिरवा चारा टाकताना तरुण...

हेही वाचा - सोलापुरात आणखी 21 जणांना कोरोनाची लागण; आतापर्यंत 364 कोरोनाबाधित, तर 150 जण कोरोनामुक्त

हेही वाचा - सुरक्षित प्रसूतीसाठी गर्भवतीची २५० किमी पायपीट... छायाचित्रकाराने केली मदत

Last Updated : May 17, 2020, 12:15 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.