सोलापूर - शहरातील बुधवारचा महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि पोलिसांनी बंद पाडला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी एकत्रित येऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. असे असताना देखील आज बुधवार बाजार हा मोठ्या प्रमाणावर भरायला सुरुवात झाला होता. बुधवार बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने तत्काळ दखल घेत बुधवार बाजार बंद पाडला.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत शहर व जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, जत्रा यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, आठवडी बाजारही ही भरवू नयेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. असे असतानाही सोलापूर शहरात नियमितपणे भरणारा बुधवार बाजार हा दुपारी मोठ्या प्रमाणावर भरायला सुरूवात झाली होती.
बुधवार बाजारात गर्दी होईल, हे लक्षात आल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क होऊन सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला सोबत घेऊन तत्काळ बुधवार बाजारात दाखल झाले. त्यांनी बाजारामध्ये बसलेल्या विक्रेत्यांना विनंती करत बाजारात विक्रीसाठी बसू नये, असे आवाहन केले. विक्रीसाठी बसलेल्या व्यापाऱ्यांनी त्यांची दुकान काढून घ्यायला लावली आणि बुधवार बाजार बंद ठेवण्यात आला.
हेही वाचा - Coronavirus : मंत्रालयातही 'कोरोना'चा धसका, सुरू केली 'स्वच्छता मोहीम'
हेही वाचा - 'कोरोना'चा रुग्ण आढळल्याची बनावट पोस्ट सोशल मीडियावर प्रसारीत; अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल