ETV Bharat / state

सोलापुरात दोनशे वर्षात दुसऱ्यांदा मोहरमच्या मिरवणुकीवर ग्रहण

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी यावर्षी मोहरमच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोलापूर मोहरम कमिटीचे अध्यक्ष मकबूल मोहोळकर यांनी दिली.

Muharram
मोहरम
author img

By

Published : Aug 23, 2020, 2:07 PM IST

सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोनशे वर्षातून दुसऱ्यांदा सोलापूरमध्ये मोहरम उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. यापूर्वी 1983 ते 1989 दरम्यान जातीय दंगलींमुळे मोहरम सणाच्या मिरवणूक रद्द झाल्या होत्या. कोणताही सण सार्वजनिक साजरा करता येणार नाही, असे आदेश शासनाने दिल्याने सोलापूरमधील मोहरमची दोनशे वर्षांची परंपरा दुसऱ्यांदा खंडित झाली आहे.

दोनशे वर्षात दुसऱ्यांदा मोहरमच्या मिरवणुकीवर ग्रहण

गेल्या दोनशे वर्षांपासून दरवर्षी सोलापूरमध्ये 10 दिवस मोहरमचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी सोलापूरसह देशात कोरोनामुळे सार्वजनिक सण-उत्सव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध सार्वजनिक सण-उत्सव रद्द झाले आहेत. यावर्षी मोहरम देखील सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता, घरीच साजरा करा, असे आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी यावर्षी मोहरमच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोलापूर मोहरम कमिटीचे अध्यक्ष मकबूल मोहोळकर यांनी दिली.

मोहरमनिमित्त सोलापूर शहरात विविध ठिकाणी पंजे, सवारी आणि ताबूतची स्थापना करण्यात येते. यामध्ये आसार मैदान ताबूत, हाजीमा ताबूत, दरवेश ताबूत, बारा इमाम ताबूत, बुऱ्हाण ताबूत हे ताबूत स्थापन करण्यासाठी पेशव्यांनी सोलापूरात मुस्लिम समाजाला जागा दिली आहे. तेव्हापासून याच जागेवर ताबूत स्थापन केले जात असल्याची माहिती मोहरम कमिटीचे अध्यक्ष व सदस्यांनी दिली.

मोहरमचा इतिहास -

हा महिना अगोदर मुस्लीम समाजात पवित्र मानला जाई मात्र, इमाम हुसेन यांच्या वधाची घटना या महिन्यात घडल्यापासून हा महिना अशुभ मानला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषक पैगंबर मोहम्मद यांचे नातू (मुलीकडून) असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी इसवी सन सातव्या शतकात करबला मैदानात (इराक) ठार मारले होते. या दिवशी ताबूत बनवण्याची प्रथा चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केली. या ताबुतांचे तोंड मक्केकडे केले जाते. हुसेन यांची हत्या झाली त्या दिवशी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळू दिले नव्हते. म्हणून या दिवशी मुस्लीमबांधवांकडून ठिकठिकाणी थंड पाण्याची सोय केली जाते. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची एकत्र मिरवणूक काढली जाते. दहा दिवस ताबूत उभारण्याची प्रथा फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळली जाते. इस्लाम धर्मानुसार मोहरमपासून त्यांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते.

मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो. इमाम हुसेन आणि त्याच्या 72 साथीदारांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोहरम साजरा केला जातो. शिया आणि सुन्नी दोन्ही समुदाय मोहरम साजरा करतात. मात्र, त्यांचा हा उत्सव साजरा करण्याचा मार्ग वेगवेगळा आहे. शिया समुदायातील लोक १० दिवस काळे कपडे घालतात.

सोलापुरात दहा दिवसांचा उत्सव -

सोलापूरमध्ये दहा दिवस मोहरम साजरा केला जातो. शहरात मोहरमच्या पाचव्या दिवसांपासून मिरवणुका काढल्या जातात. पाचव्या दिवशी छोटे मुस्लिम व बडे मुस्लिम अशा दोन सवाऱ्यांची मिरवणूक आसार मैदान येथे जाते. सहाव्या दिवशी अब्बास अली सवारीची मिरवणूक काढली जाते. सातव्या दिवशी इमामे कासमची मिरवणूक काढली जाते. आठव्या दिवशी बडे मौलाअली, बडे अकबर अली, घोडे पीर यांची संयुक्त मिरवणूक काढली जाते. नवव्या दिवशी इमाम हुसेन दरवेश सवारीची मिरवणूक काढली जाते. 51 मशाली घेऊन मुस्लिम बांधव धावत-धावत या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. दहाव्या आणि शेवटच्या दिवशी सकाळी तलवार पंजे मिरवणूक काढली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.