ETV Bharat / state

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींच्या अडचणीत वाढ; बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्याला पोलिसांनी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ या गावातून अटक केली आहे. शिवसिद्ध बुळ्ळा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

author img

By

Published : Feb 9, 2021, 9:15 PM IST

solapur mp jay siddheshwar swami Fake caste certificate case : police arrested One accused in Akkalkot
खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींच्या अडचणीत वाढ; बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदार संघाचे, भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्याला पोलिसांनी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ या गावातून अटक केली आहे. शिवसिद्ध बुळ्ळा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपीला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली.

मिलिंद मुळे बोलताना...

काय आहे प्रकरण...

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी भाजप पक्षाकडून सोलापूर लोकसभा मतदार संघातून अनुसूचित जाती प्रवर्गातुन निवडणूक लढविली होती. त्यांनी निवडणुकीत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. निवडणूकीनंतर समाजसेवकांनी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावर हरकत घेत, न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होत जात पडताळणी समितीला चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते आणि पोलिसांना देखील तसा आदेश दिला होता. यानंतर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून जातीचा दाखला गहाळ झाल्याची फिर्याद दाखल केली होती.

याचिकाकर्त्यांची उच्च न्यायालयात धाव
याचिकाकर्ते प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनय करंदीकर यांनी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावर हरकत घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात उच्च न्यायालयाने आदेश देत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

जातीचे दाखले देणारा मास्टरमाईंड गजाआड
राजकीय नेत्यांना जातीचे बनावट दाखले देणारा संशयीत शिवसिद्ध बुळ्ळा हा अक्कलकोट तालुक्यातील तडवळ या गावी राहतो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्याला मंगळवारी सकाळी गुन्हे शाखेने राहत्या घरातून अटक केले आहे. तसेच घरातील काही कागदपत्रे देखील जप्त केली आहेत. पण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सावध भूमिका घेत माध्यमांसमोर बोलण्यास टाळाटाळ केली. आम्ही अटक केली आहे आणि तपास सुरू आहे. एवढीच माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. पण सोलापूरच्या राजकीय वातावरणात अशी देखील चर्चा होत आहे की, राजकारण्यांना हा इसम जातीचे बनावट दाखले देतो. पण पोलीस तपासानंतर खरी माहिती समोर येणार आहे.

हेही वाचा - केंद्रीय कृषी कायदे तत्काळ रद्द करा, सांगोल्यातील धरणे आंदोलनात आंदोलनकर्त्यांची मागणी

हेही वाचा - माथाडी कामगारांची चळवळ टिकवण्यासाठी मी भाजपमध्ये आलो - नरेंद्र पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.