ETV Bharat / state

सोलापूरात शुक्रवारी सुरू झालेली बाजारपेठ साप्ताहिक सुट्टीनिमित्त रविवारी बंद - सोलापूर लेटेस्ट अपडेट

सोलापुरातील बाजारपेठा सुरू करण्याला 5 जून रोजी परवानगी देताना दुकानदारांना काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एक दिवस आड करून बाजारपेठ सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

सोलापूरात रविवारी बाजारपेठ संपूर्णपणे बंद

author img

By

Published : Jun 7, 2020, 2:39 PM IST

सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेल्या बाजारपेठा शुक्रवारी सुरू करण्यात आल्या. एक दिवस आड करून दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली होती. दोन दिवसानंतर आज रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सोलापुरातील सर्व बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

सोलापुरातील बाजारपेठा सुरू करण्याला 5 जून रोजी परवानगी देताना दुकानदारांना काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एक दिवस आड करून बाजारपेठ सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी एका बाजूची दुकाने उघडली. शनिवारी दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली होती. रविवारी मात्र सोलापूरातील सर्व बाजारपेठा आणि सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.

सोलापूर शहरातील नवी पेठ, दत्त चौक, टिळक चौक, पार्क चौक यासह सर्व बाजारपेठांतील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 72 दिवसांनी सोलापूरातील दुकाने शुक्रवारी सुरू झाली होती. त्यानंतर आता रविवारी साप्ताहिक सुट्टी म्हणून सोलापुरातील सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.