ETV Bharat / state

Solapur Onion Market : सोलापुरात दहा हजार टन कांद्याची आवक.. भाव गडगडले.. शेतकरी हवालदिल

author img

By

Published : Jan 27, 2022, 4:51 PM IST

एकाच दिवसात तब्बल एक हजार ट्रक कांद्याची विक्रमी आवक झाल्याने सोलापूर ( Ten Thousand Tons of Onion Arrives In Solapur ) कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Solapur Market Yard ) कांद्याचे भाव गडगडले. अचानक भाव कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला ( Onion Prices Declined Due To Influx Of Onions ) आहे.

सोलापुरात दहा हजार टन कांद्याची आवक..
सोलापुरात दहा हजार टन कांद्याची आवक..

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Solapur Market Yard ) गुरुवारी जवळपास एक हजार ट्रक कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. एक हजार गाडीत दहा हजार टन कांदा सोलापुरात दाखल झाला ( Ten Thousand Tons of Onion Arrives In Solapur ) आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ८०० ट्रक कांदा अवाक झाल्याने एक दिवस कांदा लिलाव बंद करण्यात आला होता. आज गुरुवारी पून्हा मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने भाव घसरला ( Onion Prices Declined Due To Influx Of Onions ) आहे. सोलापूर मार्केट यार्डात कांदे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे २०० ते ३०० रुपये कमी भाव मिळाला आहे.

सोलापुरात दहा हजार टन कांद्याची आवक.. भाव गडगडले.. शेतकरी हवालदिल

लागवडीचा खर्च देखील निघाला नसल्याने शेतकरी हवालदिल

सोलापूर मार्केट यार्डात कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. लागवड, मजुरी खर्च आणि खत याचा हिशोब केला तर लागवडीला जितका खर्च आला तितका भाव मिळाला नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रति क्विंटलला २०० ते ३०० रुपये कमी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

प्रति क्विंटल ५०० रूपये ते २५०० रुपये भाव

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगवेगळ्या प्रकारचा आणि उत्तम दर्जाचा दर्जाचा कांदा दाखल झाला होता. त्यामुळे ५०० रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. गुरुवारी सोलापूर मार्केट यार्डात सोलापूर जिल्ह्यासह बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यातील शेतकरी कांदा घेऊन आले होते.

व्यापारी म्हणतात भाव स्थिर

मार्केट यार्डातील अनेक व्यापाऱ्यांची दमछाक झाली आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने व्यापारी, हमाल, तोलार यांना रात्री उशिरापर्यंत मार्केट यार्डात काम करावे लागत आहे. सोलापूर मार्केट यार्डातून तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उडीसा, कर्नाटक आदी राज्यात मागणी आहे. त्यामुळे सोलापुरातील मार्केट यार्डात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून भाव घसरू दिले नाही. भाव स्थिर ठेवून लिलाव प्रक्रिया सुरू केली जात आहे. पण व्यापारी म्हणतात शेतकऱ्यांनी कांदा आणण्यास घाई गडबड करू नये. अगर सर्वच ठिकाणाहून एकाचवेळी अधिक प्रमाणात माल आल्यास भाव घसरण्याचे शक्यता आहे.

सोलापूर मार्केट यार्डात कांद्याची ऐतिहासिक आवक

सोलापूर मार्केट यार्डात गेल्या आठवडाभरापासून कांद्याची आवक वाढली आहे. मंगळवारी एकाच दिवसांत जवळपास ८०० ट्रक कांदा दाखल झाला होता. त्यामुळे दोन दिवस लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. दोन दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा एक हजार ट्रक कांदा आला आहे. एकाच दिवसात दहा हजार टन कांदा मार्केट यार्डात आल्याने ऐतिहासिक घटना घडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.