ETV Bharat / state

सोलापूरमध्ये मराठा आंदोलन पेटले; कार्यकर्त्यांचा पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न - सोलापूर मराठा आरक्षण आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने सन 2020-21 या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

Maratha Agitation
मराठा आंदोलन
author img

By

Published : Sep 11, 2020, 2:32 PM IST

सोलापूर - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षासाठी स्थगिती दिली आहे. आता राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. सोलापुरात आरक्षणासाठी अवंतीनगर येथे पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न झाला. सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने हे आंदोलन झाले. 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं', अशा घोषणांनी अवंतीनगर परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी आंदोलकांना तत्काळ ताब्यात घेत चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सोलापूरमध्ये मराठा आंदोलन पेटले

सर्वोच्च न्यायालयाने सन 2020-21 या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे मराठा समाजातील मुलांना शिक्षण क्षेत्रात आणि नोकरी भरतीवेळी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. या निकालामुळे सध्या महाराष्ट्राभर मराठा समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. सोलापुरात अवंतीनगर पाण्याच्या टाकीजवळ मराठा समाजातील युवकांनी टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त असल्याने पोलिसांनी त्यांना रोखले आणि ताब्यात घेतले.

याआंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार, ओम घाडगे, अजिंक्य पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यभर ठिकठिकाणी विरोधाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी लातूर जिल्ह्यात आरक्षण स्थगितीमुळे एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशनकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.