ETV Bharat / state

सोलापूर : केंद्रीय अर्थसंकल्पातील जलशक्ती मंत्रालयाच्या तरतुदीचे स्वागत; दुष्काळी मदतीवरून नाराजी - Marathi Business News

मागील तीन वर्षात दुष्काळाने शेतकरी होरपळलेला आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याला या अर्थसंकल्पातून कोणताही दिलासा मिळाला नसल्याची खंत शेतकरी श्रीमंत बंडगर (पाथरी ता. उत्तर सोलापूर) यांनी व्यक्त केली.

सोलापूरचे शेतकरी प्रतिक्रिया देताना
author img

By

Published : Jul 6, 2019, 7:05 PM IST

सोलापूर- केंद्रीय अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जलशक्ती मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या तरतुदीचे तसेच शेतीच्या सिंचनासाठी निधी दिल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले. तसेच दुष्काळाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात काहीही मिळाले नसल्याची तिखट प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी दिली आहे.

जलशक्ती मंत्रालय आणि त्यासाठी देण्यात आलेल्या निधीमुळे शेतीस कायमस्वरुपी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचे सोलापुरातील शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. सततच्या दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.

सोलापूरचे शेतकरी प्रतिक्रिया देताना

मागील तीन वर्षात दुष्काळाने शेतकरी होरपळलेला आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याला या अर्थसंकल्पातून कोणताही दिलासा मिळाला नसल्याची खंत शेतकरी श्रीमंत बंडगर (पाथरी ता. उत्तर सोलापूर) यांनी व्यक्त केली. सरकारने अर्थसंकल्पामध्ये आकडेवारीत न पडता धोरणात्मक चांगले निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया शेतकरी श्रीरंग मगर (हगलूर ता. उत्तर सोलापूर) यांनी दिली आहे. झिरो शेती, पंतप्रधानमंत्री जलसिंचन योजना अशा अर्थसंकल्पातून प्रस्तावित करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला.

Intro:केंद्रीय अर्थसंकल्पावर सोलापुरातील शेतकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया,
जलशक्ती मंत्रालयाचे स्वागत तर दुष्काळी मदतीवरून नाराजी
सोलापूर-
आज सादर करण्यात आलेले केंद्रीय अर्थसंकल्पा और सोलापुरातील शेतकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जलशक्ति मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या तरतुदीचे तसेच शेतीच्या सिंचनासाठी जो निधी ठेवण्यात आला आहे त्याचे स्वागत सोलापुरातील शेतकऱ्यांनी केले आहे. तसेच दुष्काळाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात काहीही मिळाले नसल्याची तिखट प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

Body:शाश्वत शेतीच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेले जलशक्ति मंत्रालय आणि या मंत्रालयासाठी देण्यात आलेल्या निधीमुळे शेतीस कायमस्वरूपी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे जलशक्ति मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या तरतुदीचे सोलापुरातील शेतकऱ्याकडून स्वागत करण्यात आले आहे तर सततच्या दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती मागील तीन वर्षात दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याला या अर्थसंकल्पातून कोणताही दिलासा मिळालेल्या नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Conclusion:बाईट- श्रीमंत बंडगर, शेतकरी, पाथरी ता. उत्तर सोलापूर
बाईट- श्रीरंग मगर, शेतकरी, हगलूर ता. उत्तर सोलापूर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.